coronavirus: ‘त्या’ रुग्णाच्या वाटेतील ‘अडथळे’ दूर, कोरोनाच्या भीतीने अडविली होती वाट    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 01:50 AM2020-05-13T01:50:36+5:302020-05-13T01:50:57+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दखल घेतल्याने गावडे यांचा मार्ग मोकळा झाला. शिवाय, संबंधितांना कळवा पोलिसांनी योग्य ती समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ​​​​​​​

coronavirus : The ‘obstacles’ in the way of ‘that’ patient were removed, the fear was blocked by the corona | coronavirus: ‘त्या’ रुग्णाच्या वाटेतील ‘अडथळे’ दूर, कोरोनाच्या भीतीने अडविली होती वाट    

coronavirus: ‘त्या’ रुग्णाच्या वाटेतील ‘अडथळे’ दूर, कोरोनाच्या भीतीने अडविली होती वाट    

Next

ठाणे : कोरोनाला घाबरू नका; पण जागरूक राहा, असे वारंवार प्रशासनाकडून आवाहन केले जात असले तरी काही ठिकाणी याचा अतिरेकही होत आहे. कळव्यातून वर्तकनगर येथे डायलिसिससाठी जाणाऱ्या राजेश गावडे (४०) यांचा रुग्णालयात जाण्याचा रस्ताच काही स्थानिक रहिवाशांनी नाहक अडविला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दखल घेतल्याने गावडे यांचा मार्ग मोकळा झाला. शिवाय, संबंधितांना कळवा पोलिसांनी योग्य ती समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतील एक कोरोनाग्रस्त पोलीस जमादार कळव्यातील ‘गुरुकृपा’ बिल्डिंगमध्ये वास्तव्याला आहे. त्यांना २० एप्रिल रोजी उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. त्यांची पत्नी आणि मुलीला भार्इंदरपाडा येथे विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. या इमारतीच्या संपूर्ण परिसराचे ठाणे महापालिकेने निर्जंतुकीकरण केले आहे. इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार मात्र सील केले आहे. या इमारतीमध्ये अत्यावश्यक सेवेचा पुरवठा स्थानिक नगरसेवक मुकुंद केणी आणि ठामपा कळवा प्रभाग समितीमार्फतीने केला जातो. याच इमारतीमधील निवृत्त पोलीस अधिकाºयाचे चिरंजीव राजेश हे किडणीच्या आजाराने ग्रस्त असून त्यांना वर्तकनगर येथे डायलिसिससाठी नियमित जावे लागते. इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने अन्य छोट्या मार्गाने सोमवारी ते डायलिसिससाठी गेले. मात्र, परतल्यानंतर त्यांचा इमारतीमध्ये जाण्याचा हाही मार्ग लाकडी बांबूने बंद करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी इमारतीला लांबचा वळसा मारून कम्पाउंड वॉल चढून द्राविडी प्राणायम करीत कसातरी प्रवेश मिळविला. आता पुढच्या वेळी डायलिसिसला कसे जायचे, या चिंतेने त्यांनी कळव्याच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

अन् मार्ग झाला मोकळा
पोलीस आयुक्त फणसळकर यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत कळवा पोलिसांना घटनास्थळी चौकशीसाठी पाठविले. तेव्हा गुरूकृपा इमारतीच्या बाजूला असलेल्या जय मातादी इमारतीमधील काही रहिवाशांनीच कोरोनाबाधित व्यक्ती त्या छोट्या मार्गाचा वापर करतील, असा समज करून तो मार्गच बंद केल्याचा दावा केला. राजेश यांचा भाऊ नितीन गावडे, सामाजिक कार्यकर्ते मंदार केणी यांच्यासमवेत पोलिसांनी सोमवारी रात्री बैठक घेऊन असा प्रकार यापुढे होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच गावडे यांचाही जाण्या-येण्याचा मार्ग मार्ग मोकळा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: coronavirus : The ‘obstacles’ in the way of ‘that’ patient were removed, the fear was blocked by the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे