Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:55 AM2020-04-18T11:55:19+5:302020-04-18T11:57:32+5:30

Coronavirus : कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आता ठाण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा दोन वर जाऊन पोहोचला आहे.

Coronavirus: One death due to corona in Thane, 115 patients SSS | Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वर

Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वर

Next

ठाणे - ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 115 वर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यामध्ये कोरोनाबाधित 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील गार्डन इस्टेट या भागात ही व्यक्ती वास्तव्यास होती. मागील पाच ते सहा दिवसांपासून त्यांच्यावर होरायझन या रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्‍हती. या रुग्णाला यापूर्वी अर्धांगवायूचा  झटका आला होता. त्यानंतर आता कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आता ठाण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा दोन वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत 115 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढला असून रुग्णांची संख्या 13,000 वर गेली आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसने आता भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. तब्बल 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील 20 नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1,54,247  हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,250,432 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 571,577 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : किसान योजनेसह श्रावणबाळच्या रकमेसाठी बँकांमध्ये गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा 

Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

 

Web Title: Coronavirus: One death due to corona in Thane, 115 patients SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.