coronavirus: रुग्णांसाठी ऑनलाइन बेड सुविधा, कॉल सेंटरही सुरू; ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:20 AM2020-07-08T01:20:59+5:302020-07-08T01:21:19+5:30
दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या अॅपचे अनावरण झाले होते.
ठाणे : कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोयिस्कर व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिकेने आॅनलाइन बेड अलोकेशन सिस्टम तयार केली असून त्यासाठीwww.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक कार्यान्वित केली आहे. याशिवाय कोविबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याकरिता कॉल सेंटरही कार्यान्वित केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या अॅपचे अनावरण झाले होते. वेबलिंक उघडल्यानंतर रुग्णांना आवश्यक ती माहिती वेबलिंकद्वारे उपलब्ध करून दिलेल्या फॉर्मवर भरून दिल्यावर ती माहिती महापालिका मुख्यालयामधील मध्यवर्ती बेड अलोकेशन पथकाला प्राप्त होईल. माहितीच्या आधारे त्यास क्लिनिकल स्टेटसनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्णय घेतला जाईल. रुग्णवाहिकेची मागणी केल्यास त्याची माहित अॅम्ब्युलन्स टीमकडे जाईल. त्यानंतर सबंधितांस सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रुग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठविण्यात येईल.
रुग्णवाहिकेत बसल्यानंतर ओटीपी विचारला जाईल. तो दिल्यानंतर रुग्णलयामध्ये दाखल करण्यासाठी नेऊन तसा अहवाल कोविगार्ड डॅशबोर्डच्या माध्यमातून रुग्णालयासही कळविण्यात येईल.
शहरामधील नागरिकांचे कोविडबाबतीत शंकाचे निरसन करण्यासाठी महापालिकेने कॉल सेंटर कार्यान्वित केले आहेत. त्यासाठी ८६५७९०६७९१, ९२, ते ९८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.