coronavirus: १७ अधिकाऱ्यांसह १९६ पोलीस विलगीकरणातून पुन्हा ऑन ड्युटी’, आतापर्यंत सात अधिकाऱ्यांसह ४0 पोलिसांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:32 AM2020-05-14T02:32:02+5:302020-05-14T02:33:02+5:30
आतापर्यंत सात अधिकाºयांसह ४0 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील २२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विलगीकरणातून तसेच रुग्णालयातूनही बरे होऊन परतणाºयांची संख्या मोठी असल्यामुळे पोलिसांमध्ये समाधान आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाइन केलेले ४१ अधिकारी आणि १५५ कर्मचारी असे १९६ पोलीस मंगळवारपासून पुन्हा ड्युटीवर रु जू झाले आहेत. आतापर्यंत सात अधिकाºयांसह ४0 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील २२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विलगीकरणातून तसेच रुग्णालयातूनही बरे होऊन परतणाºयांची संख्या मोठी असल्यामुळे पोलिसांमध्ये समाधान आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्यातील सर्वाधिक म्हणजे तीन अधिकारी आणि नऊ कर्मचारी अशा १२ जणांना कोरोनाची लागण झाली. यातील दोघे वगळता सर्वजण घरी बरे होऊन परतले आहेत. ठाणे शहर मुख्यालयातील १० कर्मचारी कोरोनाबाधित झाले. यातील सहा जणांनी कोरोनावर मात केली. ठाणेनगर एक अधिकारी, नौपाडा एक अधिकारी एक कर्मचारी, वर्तकनगर तीन, नारपोली, वागळे इस्टेट आणि विशेष शाखा प्रत्येकी एक, अंबरनाथ दोन आणि नियंत्रण कक्षातील एका अधिकाºयासह दोन कर्मचारी, अतिक्रमण विभाग, मध्यवर्ती, कळवा आणि कोपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ३३ कर्मचारी आणि सहा अधिकारी हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात तर ठाणे ग्रामीण नियंत्रण कक्षातील एका अधिकाºयालाही कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या संपर्कामुळे हायरिस्कमध्ये समावेश झालेल्या मुख्यालयातील ३९ पोलिसांना होम क्वारंटाइन केले होते.
त्यांच्यासह दोन अधिकारी आणि ५0 कर्मचाºयांना घरात विलगीकरणात तर उर्वरित १९६ जणांना केंद्रात ठेवण्यात आले होते.
यात एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील १७ अधिकारी आणि ५२ कर्मचाºयांचा समावेश होता. मुख्यालयातील एका अधिकाºयासह ४0 जणांचाही यात समावेश होता.
आता मुंब्रा पोलीस ठाण्यातील सर्वजण पुन्हा कामावर परतले आहेत. मुख्यालयात ४0 आणि वर्तकनगर २७ अशी तब्बल १९६ जणांची फौज पुन्हा कामावर रुजू झाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.