coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक, दिवसभरात सापडले हजारांहून रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:56 PM2021-03-13T20:56:53+5:302021-03-13T20:59:47+5:30
Coronavirus in Maharashtra : ठाणे जिल्ह्यातील विविध प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत होतेय मोठी वाढ
ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार १६९ रुग्ण शनिवारी आढळले आहेत. (Coronavirus in Maharashtra) जिल्ह्यात आता दोन लाख ७५ हजार ४५२ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३३२ झाली आहे. (Outbreak of coronavirus infection in Thane district, thousands of patients found in a day; Six people died)
ठाणे शहरात ३३८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६५ हजार २१६ झाली आहे. शहरात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४१२ झाली. कल्याण - डोंबिवलीत ४०९ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू आहेत. आता ६६ हजार ५५३ रुग्ण बाधीत असून एक हजार २११ मृत्यूची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये ३५ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १२ हजार १४१ झाली. तर, ३७३ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १४ बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ९२० असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ५७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ८५४ असून मृतांची संख्या ८०६ आहे.
अंबरनाथमध्ये ३४ रुग्ण आढळला असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत नऊ हजार १२२ असून मृत्यू ३१६ आहेत. बदलापूरमध्ये ४३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार ४४९ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ आहे. ग्रामीणमध्ये ६४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत १९ हजार ८६१ आणि आतापर्यंत ५९८ मृत्यू झाले आहेत.