CoronaVirus कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा 300 पार; नवे रुग्ण 25
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 06:55 PM2020-05-09T18:55:08+5:302020-05-09T18:58:49+5:30
डोंबिवली पूर्वेतील 67 वर्षीय वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले 25 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी डोंबिवली पूव्रेतील 67 वर्षीय वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4 चार झाला आहे. यापूर्वी तीन जणांचा मृत्य झाला होता. एकूण रुग्णांची संख्या 305 झाली आहे.
नव्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील एका खाजगी डॉक्टरला कोरोना झाला आहे. तो कोराना निकवर्तीयाच्या सहवासात आल्याने त्याला लागण झाली. कालही एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर चार पोलिसांचा समावेश आहे. तीन पोलिस डोंबिवल पूर्व, कल्याण पूर्व-पश्चिमेत राहणारे आहेत. एक निवृत्त पोलिस कर्मचारी आहे.तो डोंबिवली पश्चिमेला राहतो. कल्याण पूव्रेला राहणारा रेल्वे रुग्णालयात कर्मचारी, परिवहन सेवेतील वाहन चालक, कंडक्टर यांचाही समावेश आहे. डोंबिवली पूव्रेतील रुग्णवाहिकेवरील चालक, खाजगी लॅबमधीलकर्मचा:याला ही कोरोना झाला आहे. तो कल्याण पश्चिमेत राहतो. डोंबिवली पूव्रेत राहणारा खाजगी कर्मचारी व कल्याण पूव्रेतील सरकारी रुग्णालयातील कर्मचा:याला कोरोना झाला आहे. कल्याण पूव्रेतील एक, पश्चिमेतील दोन, डोंबिवली पूव्रेतील 2 आणि पश्चिमेतील चार जणांना कोरोना झाला आहे. हे नऊ जण कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पूर्व व मांडा टिटवाळ्य़ात प्रत्येकी एक रुग्ण मिळून आला आहे. हे दोन्ही रुग्ण नवे आहेत. त्यांच्या संपर्क व आजाराचा पूव्रेतिहास उपलब्ध नाही.
आत्तार्पयत आढळून आलेल्या 305 रुग्णांपैकी कल्याण डोंबिवलीतून मुंबईत ये जा करणा:या कोरोनाग्रस्त कर्मचा:यांची संख्या 121 आहे. या 121 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 41 निकट सहवासितांना कोरोना झाला आहे. उपचार घेत असलेल्या 8 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी सहा रुग्ण हे आर. आर. रग्णालयात उपचार घेत होते. आत्तार्पयत उपचारांती घरी सोडलेल्या संख्या 85 आहे. सध्या उपचार घेत असलेल्यांची संख्या 216 आहे.