CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात एकूण ५४३ रुग्ण; नव्याने ३७ रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:30 AM2020-04-24T02:30:25+5:302020-04-24T02:30:35+5:30
नवी मुंबई महापालिका शंभरीच्या उंबरठ्यावर
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे व मीरा भाईंदर या महापालिका पाठोपाठ गुरु वारी कल्याण-डोंबिवली या महापालिकेतील पॉझिटिव्ह रु ग्णांनी ही शंभरीचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबई महापालिका ही शंभरीच्या उंबरठ्यावर उभी आहे.
गुरु वारी ३७ नवे रु ग्ण सापडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५४३ वर पोहोचली आहे. यात उल्हासनगर येथेही बऱ्याच दिवसांनी रु ग्ण आढळला असून अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण आणि मीरा भाईंदर येथे गुरुवारी नव्याने एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील ठामपा कार्यक्षेत्रात ११ नवे रु ग्ण आढळून आल्याने रु ग्णांची १७८ झाली आहे. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये ७ पुरु ष आणि ४ महिलांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये ७९ वर्षीय तर महिलांमध्ये ६६ वर्षीय इतके वय आहे. तर केडीएमसीमध्येही ११ नवीन रुग्ण आढळले आहेत. येथेही ८ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. ४ जण डोंबिवली तर ६ जण कल्याण व एक रुग्ण टिटवाळा येथील रहिवासी आहे. तसेच सर्वाधिक १३ रुग्ण हे नवी मुंबईत आढळून आले आहेत. भिवंडी आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला आहे. भिवंडीतील पॉझिटिव्ह रुग्ण हा मधुमेह या आजाराने त्रस्त असून त्यांचे वय हे ६५ वर्षांचे आहे. त्यांना यापूर्वी नवी मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना भिवंडी येथील रु ग्णालयात दाखल केल्यावर ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये एकही रुग्ण नाही
ठामपात एकूण १७८ रु ग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असली तरी त्यापाठोपाठ गुरु वारी एकही रु ग्ण न सापडलेल्या मीरा भार्इंदर दुसºया क्र मांकावर आहे. तेथे एकूण ११४ रु ग्ण आहेत. केडीएमसीत रुग्ण संख्या १०६ झाली असून गुरु वारी जिल्ह्यात सर्वाधिक रु ग्ण आढळणाºया नवी मुंबईतील रुग्ण संख्या ९८ झाली आहे. बदलापूर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी १६, भिवंडी-७, अंबरनाथ-४ आणि उल्हासनगर २ असे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४३ इतके रु ग्ण सापडले आहेत.