coronavirus: रिपोर्ट निगेटिव्ह आल्याखेरीज रुग्णाची सुटका होणार नाही, केंद्राचा नियम ठाण्यात बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:02 AM2020-05-14T02:02:29+5:302020-05-14T02:03:02+5:30
ठाण्यात आठवडाभराचे उपचार घेतलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय आणि विलगीकरणाची व्यवस्था असल्याशिवाय त्याला डिस्चार्ज न देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : कोरोनाच्या रुग्णांमध्ये उपचारानंतर लक्षणे दिसत नसल्यास त्यांना विनाचाचणी डिस्चार्ज देऊन सात दिवस होम क्वारंटाइन करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय ठाणे शहरातील झोपडपट्टी, चाळीत तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास इतरांना कोरोनाची बाधा होण्यास कारणीभूत ठरण्याच्या भीतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलला. त्यामुळे ठाण्यात आठवडाभराचे उपचार घेतलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय आणि विलगीकरणाची व्यवस्था असल्याशिवाय त्याला डिस्चार्ज न देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठामपा हद्दीतील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात मृत्यूदर कसा कमी करता येईल, तसेच पाच वर्षांवरील रुग्णांसाठी अभ्यास समिती नेमण्याबाबत चर्चा झाली. पूर्ण बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या समाधानकारक असली तरी लवकरात लवकर रुग्ण बरे व्हावेत यासाठी मनुष्यबळ व रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे तसेच प्रत्यक्ष काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस आदींना लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च महापालिकेतर्फे करण्यात येईल, असे बैठकीत ठरले. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत काम करणारे जो कर्मचारी लांबून येत आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था ठाणे शहरातच केली होती, ती तशीच यापुढे करण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला.
भिवंडीत चार नवे रु ग्ण
भिवंडी शहरात बुधवारी चार नवे रुग्ण आढळले आहेत. तर, शहरातील पाच
रु ग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांमध्ये भंडारी कम्पाउंड येथील महिला, ब्रह्मानंद कामतघरमध्ये १७ वर्षीय तरुणी, सलामतपूरमध्ये वैद्यकीय कर्मचारी महिला आणि कुंभारआळी येथील दोनवर्षीय मुलगी आहे.
उल्हासनगरात नवे १९ रुग्ण सापडले
उल्हासनगर महापालिका हद्दीत बुधवारी १९ नवे रुग्ण आढळले. कॅम्प नं-१ गोलमैदान परिसर, तर हॉटस्पॉट ठरलेल्या ब्राह्मणपाडा व सम्राट अशोकनगर आदी ठिकाणी हे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ६८ झाली आहे.
ब्राह्मणपाडा, सम्राट अशोकनगर व गोलमैदान परिसरात प्रत्येकी २० व १३ कोरोना रु ग्ण सापडले. अद्याप ८९ जणांचा स्वॅब चाचणीचा अहवाल येणे बाकी असून चार दिवसांत ५० रुग्णांची भर पडली.
ब्राह्मणपाड्यात राहणाºया पोलीस कर्मचाºयास कोरोनाची लागण झाली. त्याच्या संसर्गामुळे तब्बल १३ जणांना लागण झाली. तसाच प्रकार सम्राट अशोकनगर येथील असून तेथे रु ग्णांची संख्या १५ झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीत दोघांचा मृत्यू
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवारी कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळले आहेत. तर, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यापैकी एक कल्याण पश्चिम तर, एक जण डोंबिवली पूर्वेतील आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या सात इतकी झाली आहे. तर, एकूण रुग्णांची संख्या ३८५ झाली आहे.
नव्या २० रुग्णांपैकी सहा जण हे डोंबिवली पूर्वेतील, आठ जण कल्याण पूर्वेतील, दोन जण डोंबिवली पश्चिमेतील, दोन जण कल्याण पश्चिमेतील आणि मांडा-टिटवाळा परिसरातील एक जण आहे. या २० रुग्णांमध्ये चार महिला व १६ पुरुष आहेत. आतापर्यंत एकूण उपचार घेत असलेल्या १३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. तर, सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २४८ आहे.