Coronavirus : किसान योजनेसह श्रावणबाळच्या रकमेसाठी बँकांमध्ये गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:39 AM2020-04-18T11:39:36+5:302020-04-18T12:13:58+5:30
Coronavirus : ग्रामीण भागातील सर्वच बँकांच्या परिसरात सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक अंतरचा फज्जा उडालेला आहे.
ठाणे - संचारबंदीत सर्वच कामधंदे बंद आहे. पण या कालावधीत प्रधानमंत्री किसान योजना, श्रावणबाळ वृद्ध व निराधार आदी योजनांच्या रकमा शासनाने बँकांमध्ये जमा केलेल्या आहेत. त्या रकमा पदरात पाडून घेण्यासाठी वृद्धांची बँकेत गर्दी झाली आहे. त्यांच्यासाठी सध्याचे हे अर्थ सहाय्य मोलाचे ठरत आहे. पण यामुळे ग्रामीण भागातील सर्वच बँकांच्या परिसरात सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक अंतरचा फज्जा उडालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहे.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण, दुर्गम भागात सोशल डिस्टंट फारसा विचारात घेतल्या जात नसल्याची खंत जाणकार ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यात शेतकर्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे सुमारे दीड वर्षांपासूनच मिळत आहे. दोन हजार रुपये प्रमाणे तीन टप्यात ही रक्कम शेतकर्यांना मिळते. ती रक्कम आता शेतकर्यांना मिळत आहे. यासह निराधार वयोवृद्ध, विधवा, परितक्ता आदी महिलांना मिळणारे शासनाचे मानधन ही आता बँकेत जमा झाले आहेत. ते मिळवण्यासाठी बँकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याच्या वृत्ताला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे यांनी दुजारा दिला.
Coronavirus : डाळींसह भाजीपाल्याचा भाव वाढल्याने ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप!https://t.co/d2zFvVyED8#CoronaInMaharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2020
वाढत्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी टीडीसीसी बँकेने त्यांच्या बँक शाखांमध्ये दोन पेक्षा अधिक कॅशियर काऊंटर सुरु केले आहेत. याशिवाय सोशल डिस्टंट पाळण्यासाठी गार्डद्वारे नागरिकांना उभे करुन गर्दीवर नियंत्रण केले जात असल्याचे त्यांनी भिवंडीच्या कुडूस शाखेला भेट देऊन स्पष्ट केले. याशिवाय त्यांनी दुगाडफाटा, वाडा, जव्हार, विक्रमगड आदी शाखांमध्ये भेट देऊन गर्दीवरील नियंत्रणासाठी उपाययोजना करुन सोशल डिस्टंट चे नियम पाळण्यासाठी खास यंत्रणा तैनात केल्याचे त्यांनी सांगितले. मुरबाड, धसई, शहापूर, आदी ठिकाणच्या सर्वच बँकांमध्ये सोशल डिस्टंटचे नियम पायदळी तुडवल्या जात असल्याची खंत शहापूरचे सामाजिक कार्यकर्ते भगवान दवणे यांनी व्यक्त केली. या पासून संभाव्य कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गावखेड्यांमध्ये एटीएम व्हॅन किंवा बँक कर्मचार्यांना गावात सेवा देण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरू लागल्याचे ते सांगतात.
Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवासhttps://t.co/W2dYzuBoIS#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू
कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला