Coronavirus: ठाण्यातील पोलिसांवर आता कोरोनाचे कॅशलेस उपचार होणार असल्याने दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:33 AM2020-05-07T07:33:45+5:302020-05-07T07:34:03+5:30

लोकमत इफेक्ट : वेदांतसह आता होरायझन, सफायरमध्येही मोफत उपचार

Coronavirus: Police in Thane are relieved that Coronavirus will now receive cashless treatment | Coronavirus: ठाण्यातील पोलिसांवर आता कोरोनाचे कॅशलेस उपचार होणार असल्याने दिलासा

Coronavirus: ठाण्यातील पोलिसांवर आता कोरोनाचे कॅशलेस उपचार होणार असल्याने दिलासा

Next

जितेंद्र कालेकर 
 

ठाणे : ठाणे शहरातील वेदांत रुग्णालयासह कळव्यातील सफायर आणि घोडबंदर रोडवरील होरायझन या कोविड रुग्णालयांचाही समावेश राज्य शासनाने पोलीस कुटुंब आरोग्य योजनेमध्ये केला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांवर या रुग्णालयांतही कॅशलेस उपचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आजाराचा योजनेत समावेश झाल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या अनेक खासगी रुग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत राज्य शासनाने समावेश केलेला नव्हता. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या अनेक पोलिसांच्या हातात लाखोंची बिले येत असल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने २ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केले होते.

राज्य शासनाने या वृत्ताची दखल घेतली असून कोरोना या आजाराचा पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत समावेश केला आहे. तसेच ठाणे शहर पोलिसांनी सफायर आणि होरायझन या दोन रुग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या विरोधात दिवस रात्र आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा:या पोलिसांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात कल्याण डोंबिवलीतील आर. आर. आणि न्यूआॅन या रुग्णालयांचादेखील समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली.

पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यावर लाखोंच्या बिलांचा भरणा करावा लागत होता, हे खरे आहे. पण आता ठाण्यातील सफायर आणि होरायझन या रुग्णालयांचा पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत शासनाने समावेश केला आहे. त्यामुळे आधी ज्यांनी बिले भरली त्यांनाही बिले सादर केल्यावर त्याची भरपाई मिळेल. शिवाय, यापुढेही पोलिसांना कॅशलेस सुविधा मिळणार आहे. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

Web Title: Coronavirus: Police in Thane are relieved that Coronavirus will now receive cashless treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.