CoronaVirus: मुंबईतील कर्मचाऱ्यांना प्रतिबंध करणारा निर्णय स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:59 PM2020-05-06T14:59:51+5:302020-05-06T15:02:34+5:30
मुंबईत काम करणारे सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार दररोज कल्याण-डोंबिवलीतून मुंबईला प्रवास करून जातात.
कल्याण- मुंबईत काम करणा-या सरकारी व खासगी कर्मचा-यांना 8 मेपासून कल्याण-डोंबिवलीत ये-जा करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय स्थगित करण्यात करण्यात आला आहे. मुंबईत काम करणारे सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार दररोज कल्याण-डोंबिवलीतून मुंबईला प्रवास करून जातात. त्यांच्यासाठी बसेस व खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सगळ्य़ात जास्त कर्मचारी हे मुंबईला कामाला जाणरे आहे. त्यांना मुंबईत लागण झाली आहे. ते कल्याण डोंबिवलीत राहतात. या कर्मचा-यांची व्यवस्था मुंबईतच त्यांच्या कामाच्या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींसह संस्थांनी केली. त्यानुसार महापलिका आयुक्तांनी मुंबईत काम करणा-या कर्मचायांना कल्याण डोंबिवलीत येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला. मात्र तूर्तास इतक्या सगळ्य़ा कर्मचा-यांची व्यवस्था करण्यास बराच वेळ लागणार आहे. जोपर्यंत ठोस व्यवस्था होत नाही. तोपर्यंत प्रतिबंध करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
मुंबईत काम करणा-या सरकारी कामगारांनी व्यवस्था मुंबई महापालिका करणार असा कालच्या आदेशात उल्लेख होता. कर्मचा-यांची व्यवस्था केल्यास त्यांच्या कुटुंबीयांचे काय, असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला होता. त्यांचे कुटुंबीय या निर्णयामुळे धास्तावले होते. मुंबईत राहण्याची व्यवस्था केली तरी त्याठिकाणी घरातील सगळा संसार त्याठिकाणी स्थलांतरित करता येणे शक्य नाही. व्यवस्था ही हॉटेलमध्येच करावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे रेसिडेन्सी हॉटेल्स बंद आहे. याशिवाय कालच्या आदेशात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या खासगी आस्थापनातील कामगारांची व्यवस्था त्यांच्या कंपन्यांनी करावी, असे म्हटले होते. लॉकडाऊनच्या काळात खासगी आस्थापनांनाही व्यवस्था करणे परवडणारे नाही. यावर योग्य तो तोडगा सरकारकडून काढला जावा, अशी आपेक्षा या कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: 173 वर्षांपूर्वीच्या 'कर्जा'ची परतफेड, कोरोना पीडितांना पैसे पाठवून मदत
प्रतिलिटर 18 रुपयांच्या पेट्रोलवर 49 रुपये टॅक्स, समजून घ्या पेट्रोल-डिझेलचं गणित...
CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर संकट; PF व्याजदरात कपात, जाणून घ्या...
CoronaVirus: कौतुकास्पद! सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी १००० कुटुंबांना दिलं धान्य
पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं
Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ