coronavirus: कल्याणला वधारला ‘चवळी’चा दर, ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे पास मिळवून मध्यरात्री विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 02:32 AM2020-07-07T02:32:54+5:302020-07-07T02:33:23+5:30

व्यसनाची तलप भागवण्याकरिता येणा-यांनी ‘चवळी’ हा कोडवर्ड ठेवला होता. जास्तीचे पैसे देऊनही त्यांनी त्यांची तलप भागवली. त्यातून सिगारेट, तंबाखू, गुटख्याचा काळाबाजार जोरात झाला.

coronavirus : The price of ‘chawli’ increased to Kalyan, ‘midnight sale’ by getting ‘those’ employee passes | coronavirus: कल्याणला वधारला ‘चवळी’चा दर, ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे पास मिळवून मध्यरात्री विक्री

coronavirus: कल्याणला वधारला ‘चवळी’चा दर, ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे पास मिळवून मध्यरात्री विक्री

Next

- मुरलीधर भवार
कल्याण : गुटख्यावर बंदी असतानाही येथील पान टपऱ्यांवर गुटखा राजरोस विकला जात होता. पानटप-यांभोवती सिगारेटचा धूर हवेत उडणारी, तांबूल सेवन करुन टपरीवर गप्पा झोडणा-या टवाळ पोरांची मैफल लॉकडाऊनमध्ये बंद झाली. मात्र व्यसनाची तलप भागवण्याकरिता येणा-यांनी ‘चवळी’ हा कोडवर्ड ठेवला होता. जास्तीचे पैसे देऊनही त्यांनी त्यांची तलप भागवली. त्यातून सिगारेट, तंबाखू, गुटख्याचा काळाबाजार जोरात झाला. ही उलाढाल कोट्यवधींच्या घरात झाली. पोलिसांना हे माहीत होते. मात्र रस्त्यावर फिरणा-यांना दंडुके मारण्यात धन्यता मानणा-या पोलिसांनी या काळाबाजाराकडे चक्क कानाडोळा केला.

‘चवळी मिळेल का?’ या कोडवर्डमध्ये गुटखा, तंबाखू विकली गेली. त्यांची पाकिटे पांढºया प्लास्टिक पिशवीत होती. त्या पिशवीवर ‘चवळी’ असे लिहिलेले आढळून आले. लॉकडाऊनला सुरुवातीच्या काळात टपरी व दुकानदारांकडे असलेला पान, गुटखा, सिगारेट, तंबाखूचा स्टॉक चालविला गेला. किराणा दुकानातून सिगारेट, तंबाखू, गुटख्याचा काळाबाजार झाला. लहान आकाराची सिगारेट २२ रुपये, मोठ्या आकाराची सिगारेट ३५ रुपये किंमतीला विकली गेली. गुटख्याची १५ रुपयांची पुडी ४० रुपये तर २५ रुपयांची पुडी ८० रुपये दराने विकली गेली. लॉकडाऊनच्या आधी सिल्व्हर रंगाची पुडी ८ रुपयांना मिळत होती. लॉकडाऊनमध्ये तीच पुडी ८० रुपये दराने विकली गेली.

प्रत्येक जनरल व किराणा स्टोअरमधून सिगारेट, तंबाखू, गुटखा विकला गेला. ओळखीच्या व्यक्ती व दुकानदारालाच हा माल विकला जात होता. मालाची डिलीव्हरी करणारे गाडीच्या डिक्कीतून किंवा एका साध्या कागदी पिशवीतून रात्री ११ नंतर मध्यरात्री २ वाजेपर्यंत माल वितरीत करीत फिरत होते. ब्लॅकची किंमत जास्त असल्याने दुचाकीचे पेट्रोल विकणाºयाला परवडत होते. त्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेचे पासही होते. अनेक नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या नैतिक कामाकरिता अत्यावश्यक सेवेचे पास मिळत नव्हते. मात्र तंबाखू, गुटखा, सिगारेट व दारुचा काळाबाजार करणाºयांना ते पोलिसांचे सहकार्य असल्याखेरीज कसे मिळाले, असा सवाल केला जात आहे. हा  सगळा माल लॉकडाऊनच्या काळात भिवंडीतून येत असल्याचे एका जाणकाराने सांगितले. हा माल घेऊन येणाºयास फोनवर ‘चवळी घेऊन ये’ असे सांगितले जात होते. पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याने आता ‘चवळी’चा बाजार वधारणार आहे.

दारूच्या काळ्याबाजाराची नशा
लॉकडाऊनमध्ये वाइन शॉप, बार बंद झाले. त्यामुळे घसा कोरडा पडलेल्या तळीरामांची घालमेल सुरू झाली. त्या काळात 150 ते २०० रुपयांची क्वार्टर एक हजार ते १२०० रुपयांना विकली गेली. ब्रॅण्डेड स्कॉच व्हिस्की जी 3500 रुपयांना मिळते, तिचे दर सात ते आठ हजार रुपयांपर्यंत चढले होते. त्यापेक्षा महागड्या म्हणजे पाच ते सहा हजार रुपयांच्या उंची मद्याकरिता १८ ते २० हजार रुपये उकळले गेले.

Web Title: coronavirus : The price of ‘chawli’ increased to Kalyan, ‘midnight sale’ by getting ‘those’ employee passes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.