coronavirus : परधर्माच्या व्यक्तीकडुन पार्सल घेणे नाकारले, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 09:02 PM2020-04-24T21:02:46+5:302020-04-24T21:03:13+5:30

एका आॅनलाईन कंपनीचे पार्सल घरोघरी पोहचवण्याचे काम करणारा कर्मचारी मीरारोड कार्यालयाने दिलेले पार्सल घेऊन मंगळवारी डिलीव्हरी देण्यासाठी गेला होता.

coronavirus: refuses to take parcels from person of other religions | coronavirus : परधर्माच्या व्यक्तीकडुन पार्सल घेणे नाकारले, गुन्हा दाखल

coronavirus : परधर्माच्या व्यक्तीकडुन पार्सल घेणे नाकारले, गुन्हा दाखल

Next

मीरारोड - डिलीव्हरी घेऊन आलेला कर्मचारी हा दुसराया धर्माचा असल्याने त्याच्या हातुन पार्लस घेण्यास नकार देणाराया गजानन चर्तुवेदी रा. जया पार्क, मीरारोड विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका आॅनलाईन कंपनीचे पार्सल घरोघरी पोहचवण्याचे काम करणारा कर्मचारी मीरारोड कार्यालयाने दिलेले पार्सल घेऊन मंगळवारी डिलीव्हरी देण्यासाठी गेला. कोरोनाच्या नियमा प्रमाणे कर्मचारायाने सुप्रिया चर्तुवेदीना कॉल करुन इमारती खाली येण्यास सांगीतले. त्या गजानन सह खाली आल्या. गजानन यांनी नाव विचारले असता त्याने नाव सांगीतले. परंतु नाव ऐकताच आम्ही तुमच्या धर्माच्या लोकां कडुन पार्सल घेणार नाही असे गजाननने सांगीतले. त्यावर कर्मचारायाने मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. त्याच दिवशी सायंकाळी काशिमीरा पोलीस ठाण्यात कर्मचारायाच्या फिर्यादी वरुन गजानन विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

Web Title: coronavirus: refuses to take parcels from person of other religions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.