Coronavirus: कळवा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना; कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:39 AM2020-05-06T02:39:05+5:302020-05-06T02:39:20+5:30
योग्य सुविधा मिळत नसल्याचा केला आरोप
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णायातील एका ५५ वर्षीय वैद्यकीय महिला अधिकाºयालाच कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या इतर ३ ते ४ वैद्यकीय अधिकारी तसेच तिच्या २ मुलींची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वीदेखील याच हॉस्पिटलमधील अन्य एका वैद्यकीय महिला कर्मचाºयालाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी लढा देणाºया अधिकारी तसेच नर्सना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचे या हॉस्पिटलमधील स्टाफचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयात लोकमान्यनगरातील एका रुग्णाच्या संपर्कात येऊन एका महिला कर्मचाºयास कोरोना लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमधील जवळपास ६० जणांना क्वॉरंटाइन केले होते. तर हॉस्पिटलमधील प्रसूती विभागदेखील बंद केला आहे. आता आणखी एका ५५ वर्षीय महिला वैद्यकीय अधिकाºयालादेखील त्याची लागण झाल्याने इतर वैद्यकीय अधिकाºयांमध्येदेखील भीतीचे वातावरण आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या हॉस्पिटलमध्ये युनिट हेड असून त्यांच्या संपर्कात त्यांच्या दोन मुली आणि इतर तीन ते चार वैद्यकीय अधिकारी आहेत. या सर्वांना चाचणी करून क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
पीपीई किट्स मिळत नाहीत
येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारचे पीपीईो किट्स उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे आरोप हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सकडून केला जात आहे.
मागणी करूनही अद्याप महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे; परंतु हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकाºयांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून अधिकारी आणि महिला कर्मचारी यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे.
याशिवाय आयसोलेशन वॉर्डमध्ये जाताना पीपीई किट्स दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
रुग्णालयप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस
मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवार्इंकाच्या स्वाधीन केला होता. परंतु, त्यानंतर तो मयत पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
सलग तिसºयांदा रुग्णालयाने अशी चुक केल्याने अखेर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रुग्णालयप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर ते काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील वागळे इस्टेटच्या इंदिरानगरातील हनुमाननगरमधील एका ५५ वर्षीय रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची करोना चाचणी प्रशासनाने केली होती. मात्र, तिचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. परंतु, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका प्रशासनाची झोप उडाली आहे.
या रुग्णाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शनास आणि अंत्ययात्रेत अनेकजण सामील झाल्याचे बोलले जात असून यामुळे डोंगर टेकडीवर वसलेल्या दाटीवाटीच्या भागात करोनाचे संकट गडद झाल्याचे चित्र आहे. यापूर्वीही या रुग्णालयाकडून दोनदा अशी चुक घडली होती. आता तिसºयांदा ती झाल्याने महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबधींत रुग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती महापालिकेने दिली.