coronavirus: ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा निर्बंधांची वेसण, नियम मोडाल तर आस्थापना होतील सिल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 04:06 PM2021-03-17T16:06:01+5:302021-03-17T16:06:55+5:30

coronavirus in Thane : नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले.

coronavirus: Restrictions in Thane again for Stop coronavirus | coronavirus: ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा निर्बंधांची वेसण, नियम मोडाल तर आस्थापना होतील सिल

coronavirus: ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा निर्बंधांची वेसण, नियम मोडाल तर आस्थापना होतील सिल

Next

ठाणे  - राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स व इतर आस्थापना या रात्री ११.३० पर्यंत सुरू राहणार आहेत. तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले. (Restrictions in Thane again for Stop coronavirus )

बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी जे नियम आखण्यात आले होते, तेच नियम आताही लागू असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स, दुकाने, बाजारपेठामधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाने काढलेल्या आदेशाची माहिती या आस्थापनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली असून त्यांनी देखील नियमांचे पालन केले जाईल असे स्पष्ट केले असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.

मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदींठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रवेशाच्या वेळी प्रत्येकाचे तापमान तपासून प्रवेश, लक्षणो असणा:यांना प्रवेश नाही, हॅन्ट सॅनिटाझर प्रत्येक ठिकाणी प्रवेशद्वारावर असावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टेसिंग, शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृह, रेस्टॉरेन्टमध्ये प्रवेश देतांना घालून दिलेल्या र्निबधाचे उल्लघन होणार नाही याची योग्य ती खबरदारी मॉल व्यवस्थापनाकडून घेण्यात यावी.कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास त्या ठिकाणच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्तीच
यापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु आता त्याठिकाणी 5क् माणसांनाच परवानगी असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी देखील २० माणसांचीच परवानगी असणार आहे.

गृह विलगीकरणासाठी निर्बंधासह परवानगी
स्थानिक प्रशासनास व वैद्यकीय अधिका-यांच्या देखरेखाली गृह विलगीकरण कवण्यात येईल. १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराना पॉझीटीव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरन्टाइनचा शिक्का मारला जाणार, तसेच त्याच्या घरातील इतर नागरीकांना घराबाहरे जाणो टाळावे व मास्कचा वापर करावा या आदेशाचे उल्लघंन केल्यास गृह विलीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीला तत्काळ कोवीड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल.

आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनात ५० टक्के उपस्थिती आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर खाजगी किंवा शासकीय कार्यालयांमध्ये देखील पूर्वीप्रमाणे 5० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल याची जबाबदारी संबधींत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देखील ऑनलाईन बुकींग करुन दर्शन घ्यावे.
 
या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्च २०२१ र्पयत बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु या आदेशाचे उल्लघंन झाल्यास संबधींत आस्थापना सील केल्या जातील. परंतु जो र्पयत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोर्पयत त्या आस्थापना सुरू करता येणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घेऊनच त्या आस्थापना सुरु करता येतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: coronavirus: Restrictions in Thane again for Stop coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.