CoronaVirus: दिव्यातील २0 दवाखाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:33 AM2020-06-26T00:33:26+5:302020-06-26T00:33:35+5:30
रुग्णांवर औषधोपचार केलेल्या दिव्यातील २0 डॉक्टरांचे दवाखाने ठामपाच्या दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी मागील दोन दिवसांत सील केले.
मुंब्रा : ठाणे महापालिकेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून रुग्णांवर औषधोपचार केलेल्या दिव्यातील २0 डॉक्टरांचे दवाखाने ठामपाच्या दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी मागील दोन दिवसांत सील केले. त्यामुळे डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. येथे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जास्त ताप असणाºया रुग्णांना वेळीच क्वारंटाइन करता यावे, यासाठी तापावर औषधे घेण्यासाठी येणाºया रुग्णांची माहिती कळवण्याचे आवाहन डॉक्टरांना एका बैठकीत करण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष करून जे डॉक्टर ताप असलेल्या रुग्णांवर उपचार करत होते, अशा दिवा शहरातील २0 दवाखान्यांवर कारवाई करून ती सील केल्याची माहिती दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुनील मोरे यांनी लोकमतला दिली.