Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२३ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 08:26 PM2021-07-11T20:26:34+5:302021-07-11T20:34:05+5:30

Coronavirus in Thane :ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२३ ने वाढली असून सात जणांचा रविवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ७८१ रुग्णांची व दहा हजार ८४३ मृतांची नोंद करण्यात आली.

Coronavirus: Seven deaths in Thane district with 423 coronavirus cases | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२३ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू  

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२३ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू  

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२३ ने वाढली असून सात जणांचा रविवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ७८१ रुग्णांची व दहा हजार ८४३ मृतांची नोंद करण्यात आली. (Seven deaths in Thane district with 423 coronavirus cases)

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरात ७५ रुग्ण आढळले आहे. आज दिवसभरात एका जणाचा मृत्यू झाला. यासह शहरातील बाधितांची संख्या एक लाख ३४ हजार ४११ झाली आहे. तर असून मृतांची संख्या दोन हजार ३७ नोंदली गेली. कल्याण डोंबिवलीत ७९ बाधीत व मृत्यू नाही. यासह या शहरात एक लाख ३७ हजार‌ ५५३ बाधितांसह दोन हजार ६२८ मृतांची नोंद आहे.

उल्हासनगरमध्ये १२ बाधीत व तीन मृत्यू झाले आहे. यासह शहरात २० हजार ८८३ बाधितांना ५२६ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीत दोन बाधीत असून एकही मृत्यू नाही. यामुळे या शहरातील दहा हजार ६५६ बाधितांसह ४६० मृत्यू नोंद कायम आहेत. मीरा भाईंदरला ५१ बाधीत व एक मृत्यू झाले. या शहरातील ५१ हजार ८८ बांधिता व एक हजार ३४३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये १३ बाधीत झाले मात्र मृत्य नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार ९०६ व मृतांची संख्या ५१८ नोंदली आहे. कुळगांव बदलापूर शहरात २९ बाधीत सापडले. यासह येथील बाधीत २१ हजार ३३९ तर मृत्यू ३४९ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ४७ बाधीत झाले असून आज मृत्यू नाही. यामुळे या ग्रमीण क्षेत्रात आजपर्यंत ३९ हजार ९०१ बाधितांची व एक हजार १९५ मृतांची नोंद झाली आहे.

Web Title: Coronavirus: Seven deaths in Thane district with 423 coronavirus cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.