Coronavirus : शाहीनबाग आंदोलन अंशत: स्थगित, सुरक्षेच्या दृष्टीने उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:42 AM2020-03-19T00:42:24+5:302020-03-19T00:42:40+5:30
भिवंडीतील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील ४७ दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग आंदोलन मंगळवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत अंशत: स्थगित
भिवंडी : कोरोनाच्या धास्तीने नागरिकत्व कायद्याविरोधात भिवंडीतील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील ४७ दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग आंदोलन मंगळवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत अंशत: स्थगित करण्यात आल्याची माहिती संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे.
शाहीनबाग आंदोलनात रात्री महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. कोरोनाच्या भीतीने व महिलांच्या सुरक्षेबाबत आता हे आंदोलन अंशत: स्थगित करण्यात आले आहे. काही मोजक्या महिला या आंदोलनात मास्क व सॅनिटायझरचा वापर करून दिवसा हे आंदोलन सुरूच राहणार आहे. रात्रीच्यावेळी महिला थांबणार नसून दिवसभर काही मोजक्या महिला या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेत तोंडावर मास्क लावून सहभागी होणार आहेत. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने भिवंडीतील मिल्लतनगर, वंजारपट्टीनाका या ठिकाणी ४७ दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात महिला आंदोलन करत आहेत.