coronavirus: कोरोना पाॅझिटिव्ह बाळंतिणीची शिवसेनेने घेतली कुटुंबाप्रमाणे काळजी  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:35 PM2020-06-12T19:35:56+5:302020-06-12T19:38:23+5:30

बाळाची व पाॅझिटिव्ह आईची ताटातूट होऊ नये, म्हणून त्यांनी या दोघांची मर्फी आरटीओजवळील हाॅटेलमध्ये विशेष व्यवस्था केली.

coronavirus: Shiv Sena takes care of corona positive Women like family | coronavirus: कोरोना पाॅझिटिव्ह बाळंतिणीची शिवसेनेने घेतली कुटुंबाप्रमाणे काळजी  

coronavirus: कोरोना पाॅझिटिव्ह बाळंतिणीची शिवसेनेने घेतली कुटुंबाप्रमाणे काळजी  

Next

ठाणे - कोरोनाच्या दुर्धर वातावरणात तिने गोंडस कन्येला जन्म दिला. माञ मातृत्व पदरी पडताच पाॅझिटिव्ह आलेल्या मातेची बाळापासून ताटातूट होऊ नये, म्हणून हाॅटेलात विशेष व्यवस्था शिवसेनेने केली. अंगडी, दुपटी, फळे, औषधे, मेथी - डिंकाचे लाडू असा सकस खुराक सुरु करताना पाॅझिटिव्ह बाळतिंणीची शिवसेनेने घरातील माहेरवाशीणीसारखी काळजी घेतली. एकीकडे  रक्ताच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली असताना शिवसेनेने मायेची पाखर दिल्याने या मातेच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालया शेजारी असलेल्या धर्मवीर नगरात सदर महिलेचे पती गेली दहा वर्षे राहतात. हातावर पोट असलेल्या  त्यांची  पत्नी २ जूनला कळव्याच्या छञपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूत झाली. तिने मुलीला जन्म दिला. माञ ५ जून रोजी पारदळे यांच्या पत्नी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. अवघ्या तीन दिवसांच्या बाळाची काळजी कोण घेणार, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर कुटुबांसमोर उभा ठाकलेला असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले - जाधव यांची टीम या कुटुबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

बाळाची व पाॅझिटिव्ह आईची ताटातूट होऊ नये, म्हणून त्यांनी या दोघांची मर्फी आरटीओजवळील हाॅटेलमध्ये विशेष व्यवस्था केली. यासोबतच या मुलीची काळजी घेण्यासाठी तिच्या वडिलांना हाॅटेलमध्येच ठेवले. केवळ हीच व्यवस्था करुन शिवसैनिक थांबले नाहीत. तर हाॅटेलमध्ये ठेवलेल्या या कुटुबियांची प्रत्येक अपडेट रुपाली रेपाळे व नम्रता भोसले-जाधव घेत होत्या. बाळाला पाळणा, छोटी गादी, अंगडी, दुपटी, नवजात शिशू सेट, औषधे पुरवली. तसेच पाॅझिटिव्ह बाळंतिणीला मेथी - डिंकाचे लाडू, मास्क, सॅनिटायझर, फळे, सकस जेवण  रेपाळे यांच्याकडून पाठविण्यात आले.


मला माझ्या कुटुंबीयांपेक्षा जास्त प्रेम मिळाले
अगदी सर्वसामान्य स्थितीत माझी प्रसुती झाली असती तरी मला व माझ्या बाळाला इतक्या सोयीसुविधा मिळणे, कठीण होते. अगदी तशी एखाद्या कुटुबांप्रमाणे शिवसेनेने काळजी घेत माझी जपणूक केल्याचे या पाॅझिटिव्ह मातेने सांगितले.

Web Title: coronavirus: Shiv Sena takes care of corona positive Women like family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.