coronavirus: धक्कादायक! एकाच रुग्णालयातील ३ डॉक्टर आणि ८ परिचारिकांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:28 PM2020-06-12T19:28:05+5:302020-06-12T19:28:46+5:30
रुग्णालयातील ३ डॉक्टर, ८ नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी पत्रकार यांच्याकडे केला. तसेच त्यांच्या कुटुंब व नातेवाईकाला झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयातील ३ डॉक्टर्स व ८ नर्स सह त्यांच्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला. याप्रकाराने खळबळ उडाली असून रुग्णालयातील रुग्णात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणाहून दररोज शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. अनेकदा कोरोनचे लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवले जाते. स्वाब अहवाल नंतर रुग्ण पोझिटीव्ह येत असून इतर रुग्णांना कोरोणचा संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टर व नर्स यांनी व्यक्त केली. आजपर्यंत रुग्णालयातील ३ डॉक्टर, ८ नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी पत्रकार यांच्याकडे केला. तसेच त्यांच्या कुटुंब व नातेवाईकाला झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. रुग्णालयाला नॉन कोविड दर्जा असताना संशयित कोरोना रुग्ण उपचार साठी येतात का? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच कोरोना रुग्णाच्या मृतदेह बांधून नातेवाईकांच्या ताब्यात मध्यवर्ती रुग्णालयातून दिला जातो. असेही डॉक्टर म्हणाले आहे.
महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास मोहणलकर यांनी मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कबुली दिली. तर रुग्णालयाचे जिल्हा शल्चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी २ डॉक्टर व ५ नर्सला कोरोना संसर्ग झाला होतो. मात्र ३ दिवसा पासून सुट्टीवर असल्याने या कोरोना संसर्ग झाल्याचा निश्चित आकडा सांगता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली. मध्यवर्ती रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी यांच्या सोबत याबाबत संपर्क साधला असता त्यांच्या सोबत संपर्क होऊ शकला नाही. डॉक्टर व नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. तसेच रुग्णालयातील रुग्णात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टर व नर्सचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
मध्यवर्ती रुग्णालयातील अपुरा डॉक्टर, नर्स व कर्मचारी वर्ग, नॉन कोविड रुग्णालयाचा दर्जा असताना संशयित कोरोना रुग्णावर होत असलेल्या उपचाराने इतर रुग्णांना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली. रुग्णालयाच्या डॉक्टर व नर्स यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून सुविधा व इतर समस्या बाबत साकडे घातले आहे.