coronavirus: धक्कादायक! रुग्णवाहिकाचालक, आशांना वेतन नाही, डायलेसिस रुग्णांचीही परवड  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:04 AM2020-05-10T04:04:45+5:302020-05-10T04:05:37+5:30

ठाणे महापालिकेच्या सेवेते कार्डियाक रुग्णवाहिका चालविणारे २६ चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. तर सुमारे २०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोनाबाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे १५०० रुपयांचे मानधन देण्यात येते.

coronavirus: shocking! no payment to Ambulance drivers, asha workers, even affordable dialysis patients | coronavirus: धक्कादायक! रुग्णवाहिकाचालक, आशांना वेतन नाही, डायलेसिस रुग्णांचीही परवड  

coronavirus: धक्कादायक! रुग्णवाहिकाचालक, आशांना वेतन नाही, डायलेसिस रुग्णांचीही परवड  

Next

ठाणे : कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक आरोग्यसेवक जीवावर उदार होऊन काम करीत आहे. मात्र, या आरोग्यसेवकांना त्यांचा मेहनतानाच ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेला नाही. त्यामध्ये कार्डियाक रुग्णवाहिका चालवणारे चालक आणि आशा स्वयंसेविकांचाही समावेश असल्याची बाब माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटील यांनी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे, पाटील यांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणूनही जैसे थे परिस्थिती आहे.

ठाणे महापालिकेच्या सेवेते कार्डियाक रुग्णवाहिका चालविणारे २६ चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. तर सुमारे २०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोनाबाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे १५०० रुपयांचे मानधन देण्यात येते. मात्र, तेही जानेवारी महिन्यापासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. ही बाब आपण महापालिका आयुक्तांना फोनद्वारे कळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी फोन न घेतल्याने मेसेज करून याची माहिती दिली आहे. तसेच, मुख्य आरोग्य अधिकारी माळगावकर यांनाही ही बाब सांगितली आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची दखलच घेतलेली नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

डायलेसिस केंद्र उद्घाटनाअभावी बंद
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाणे महापालिकेचा हलगर्जीपणा डायलेसिसच्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अनेक रुग्णालये कोविड-१९ साठी अधिग्रहित केलेली आहेत. त्यामुळे डायलेसिससाठी रुग्णांना धावपळ करावी लागत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात डायलेसिसची संपूर्ण यंत्रणा १० महिन्यांपासून उभी आहे. मात्र, उद्घाटन न झाल्याने तिचा वापरच करण्यात येत नाही; ही बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

Web Title: coronavirus: shocking! no payment to Ambulance drivers, asha workers, even affordable dialysis patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.