Coronavirus: डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार; पळून गेलेला कोरोनाबाधित रुग्ण फुटपाथवर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 02:34 PM2020-07-10T14:34:02+5:302020-07-10T14:34:13+5:30

शास्त्रीनगर रुग्णालयातून पळालेला कोरोना बाधीत रुग्ण फुटपाथवर, कोरोनाबाधित रुग्णांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल  

Coronavirus: shocking type in Dombivli; The fleeing coronary patient was found on the sidewalk | Coronavirus: डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार; पळून गेलेला कोरोनाबाधित रुग्ण फुटपाथवर सापडला

Coronavirus: डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार; पळून गेलेला कोरोनाबाधित रुग्ण फुटपाथवर सापडला

Next

कल्याण- एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या रूग्ण संख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे .  शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचे दिसून येत आहे  स्थानिक रहिवाशांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. काही कालावधी नंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुहासिनी बडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयसीयू मध्ये सदर रुग्ण उपचार घेत होता मात्र आयसीयू मध्ये 2 रुग्णाचा मृत्यू झाला होता हे मृतदेह बाहेर काढण्यात रुग्णालय स्टाफ व्यस्त असल्याचा फायदा घेत हा रुग्ण पळून गेला मात्र गर्दीत याची माहिती मिळण्यास उशीर झाला माहिती मिळताच त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती खालावल्या मुळे त्याचा मृत्यू झाला असे सांगत कॅमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला

याबाबत सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आरोग्य विभागाने मनात आणलं तर कोरोना नियंत्रणात आणू शकतात मात्र त्यांची मानसिकता नाही ,या घटनेस  जबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाइ करावी अशी मागणी केली आहे

Web Title: Coronavirus: shocking type in Dombivli; The fleeing coronary patient was found on the sidewalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.