coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ, दिवसभरात सापडले 773 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:05 PM2020-06-11T20:05:14+5:302020-06-11T20:05:27+5:30

गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात 773 बाधितांची तर, 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 13 हजार 715 तर, मृतांचा आकडा 468 झाला आहे.

coronavirus: Significant increase in the number of corona patient in Thane district | coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ, दिवसभरात सापडले 773 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू 

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ, दिवसभरात सापडले 773 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू 

Next

ठाणेठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. बुधवारी ठाणे जिल्ह्यातील आता पर्यंतची उच्चांकी नोंद झाली होती. त्यात दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीने साडेसातशेचा टप्पा पार केल्यामुळे बाधितांच्या आकडेवारीचा नवा विक्रम झाला आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात 773 बाधितांची तर, 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 13 हजार 715 तर, मृतांचा आकडा 468 झाला आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद होत आहे.
 
 ठाणे महानगर पालिका हद्दीत 170 बाधितांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा 4 हजार 655 तर,मृतांचा आकडा 145 वर पोहोचला आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेत सर्वाधिक 195 रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 3 हजार 414 तर, मृतांचा आकडा 107 वर पोहोचला आहे. तर, कल्याण –डोंबिवलीमध्ये 87 रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 726 तर, मृतांचा आकडा 55 इतका झाला आहे.

तसेच मीरा भाईंदर मध्ये 145 रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 338 तर, मृतांचा आकडा 73 इतका झाला आहे. भिवंडी महापालिका हद्दीत 43 रुग्णांची करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 395 इतका झाला आहे. उल्हासनगर 15 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे बाधितांचा आकडा 690 तर, मृतांचा आकडा 25 झाला आहे. अंबरनाथमध्ये 86 रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 541 तर, मृतांचा आकडा 18 इतका झाला आहे. बदलापूरमध्ये 26 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 380 झाला आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 10 रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 575 वर गेला आहे.

Web Title: coronavirus: Significant increase in the number of corona patient in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.