coronavirus: कळवा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण मानसिक स्वास्थ राखण्यासाठी खेळाचे साहित्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 03:36 PM2020-09-19T15:36:58+5:302020-09-19T15:37:10+5:30

उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे मानसिक संतुलन ढासळू नये या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे खेळाचे साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

coronavirus: Sports equipment for maintaining mental health of patients at Kovid Center at Kalwa | coronavirus: कळवा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण मानसिक स्वास्थ राखण्यासाठी खेळाचे साहित्य

coronavirus: कळवा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण मानसिक स्वास्थ राखण्यासाठी खेळाचे साहित्य

googlenewsNext

ठाणे - म्हाडाच्या माध्यमातून कळव्यात उभारण्यात आलेल्या कोवीड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला 200 रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु येथे आता संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण आला तरी उपचारासाठी येथे घेतले जाईल असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टिवीट द्वारे दिली आहे. विशेष म्हणजे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे मानसिक संतुलन ढासळू नये या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे खेळाचे साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

कळवा येथे म्हाडाच्या माध्यमातून हे कोवीड सेंटर उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी 400 बेड असून सध्याच्या घडीला येथे 200 रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून या रुग्णालयाचे कामकाज हाताळले जात आहे. काही दिवसांपूर्वी हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. चांगल्या दर्जाचे अन्नही रुग्णांना दिले जात आहे. तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची फौजही उपलब्ध आहे. दरम्यान एखाद्याला कोरोना झालाच तर त्याचे मानसिक संतुलनही बिघडत असते. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात. परंतु त्यातून काही रुग्णांना याचा जास्तीची त्रस होत असतो. त्यामुळे अशा रुग्णांचे मानसिक स्वास्थ चांगले राहावे या उद्देशाने येथील कोवीड सेंटरमध्ये विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यातही येथे लहान मुले देखील उपचारासाठी दाखल आहेत. त्यांच्यासाठी कॅरम, बॅडमेंटन, बुध्दीबळ आदींसह इतर खेळे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मोकळ्या जागेत मुले सध्या येथे या खेळांचा मनमुराद आनंद लुटत असतांना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केले आहे.



या रुग्णालयात रुग्णाचे मानसिक धैर्य व शाररीक क्षमता वाढविण्याचे काम हे या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून येणा:या रुग्णांचे आम्ही येथे स्वागतच करु असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

Web Title: coronavirus: Sports equipment for maintaining mental health of patients at Kovid Center at Kalwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.