Coronavirus: रुग्णालयातून मृतदेह थेट स्मशानभूमीतच न्या; ठाणे महापालिकेची नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:35 AM2020-05-09T02:35:47+5:302020-05-09T02:36:02+5:30

कोव्हीडबाधित रुग्णांच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करून थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले

Coronavirus: Take the body directly from the hospital to the cemetery; Rules of Thane Municipal Corporation | Coronavirus: रुग्णालयातून मृतदेह थेट स्मशानभूमीतच न्या; ठाणे महापालिकेची नियमावली

Coronavirus: रुग्णालयातून मृतदेह थेट स्मशानभूमीतच न्या; ठाणे महापालिकेची नियमावली

Next

ठाणे : हॉस्पिटलमध्ये कोणत्याही आजाराने मरण पावलेल्या व्यक्तींच्या अंत्ययात्रेत येणारे नातेवाईक व मित्रमंडळीना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून कुणाचाही मृतदेह रुग्णालयातून घरी न पाठवता थेट स्मशानभूमीत पाठवून कमीतकमी लोकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरुवारी दिले.

कोव्हीडबाधित रुग्णांच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करून थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले असून, तशी नियमावलीच शहरातील सर्व रुग्णालयांना प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना निर्देशांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल होते. या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन, आयुक्तांनी नवे आदेश काढले आहेत.

Web Title: Coronavirus: Take the body directly from the hospital to the cemetery; Rules of Thane Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.