coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी आता तज्ज्ञ डॅाक्टरांचा टास्क फोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 07:59 PM2020-04-18T19:59:30+5:302020-04-18T20:00:03+5:30
कोरोना रूग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची तयार करण्यात आला आहे.
ठाणे - कोव्हीड १९ चा वाढता प्रादूर्भाव रोखण्याबरोबरच या साथ रोगामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आणि रूग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची तयार करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड १९ या साथ रोगाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सिव्हील हॅास्पीटल, होरायझन हॅास्पीटल, सफायर हॅास्पीटल, ज्यूपिटर हॅास्पीटल या ठिकाणी कोव्हीड १९ चे बाधीत रूग्ण दाखल होत आहेत.
कोव्हीड १९ या जीवघेण्या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रूग्णांचा मृत्यूदर टाळण्याच्या हेतूने आणि रूग्णालयांमध्ये भरती झालेल्या रूग्णांना तज्ज्ञ डॅाक्टरांचे मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा यासाठी महापालिकेच्यावतीने ठाणे शहरातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला असून तसे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज निर्गमित केले.
या टास्क फोर्समध्ये राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॅा. योगेश शर्मा, प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॅा. आनंद भावे, किडनी विकार तज्ज्ञ डॅा. ज्योत्स्ना झोपे, डॅा. राजेंद्र गुंजोटीकर, डॅा. विद्या कदम, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॅा. जयनारायण सेनापती, बालरोग तज्ज्ञ डॅा. जयेश पानोट, डॅा. सुहास कुलकर्णी, डॅा. संतोष कदम, भूलतज्ज्ञ डॅा. विजय पाटील, न्यूरो फिजिशयन डॅा. दिपक अहिवाले, ह्रदयरोगतज्ज्ञ डॅा. दयानंद कुंबला, चेस्ट स्पेशालिस्ट डॅा. अल्पा दलाल, वैद्यकिय तज्ज्ञ डाॅ. ऋषिकेश वैद्य, साथ रोग तज्ज्ञ डॅा. प्रिती पिलाय, इंटेसिव्हिस्ट डॅा. रवि घावत आजी तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश आहे.
दरम्यान, महापालिकेच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या रूग्णालयांमध्ये भरती झालेल्या कोव्हीड १९ बाधीत रूग्णांची प्रकृती अस्थिर आणि किंवा गंभीर आहे वाटल्यास संबंधित रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. अनिरूद्ध माळगावकर ( ९७६९००७०७०) तसेच कोव्हीड १९ चे विशेष कार्य अधिकारी डॅा. राम केंद्रे ( ९७६९६७६९६०) या व्हॅाटस ॲप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.