CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात १००१ रुग्ण वाढीसह ५२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 08:49 PM2021-05-22T20:49:34+5:302021-05-22T20:49:57+5:30

जिल्ह्यात आढळून आलेल्या या रुग्ण संख्येपैकी  ठाणे महापालिका क्षेत्रात १८८ रुग्ण सापडल्याने आता येथील रुग्ण संख्या एक लाख २७ हजार ६४३ झाली आहे.

CoronaVirus in Thane: 52 deaths in Thane district with an increase of 1001 corona patients | CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात १००१ रुग्ण वाढीसह ५२ जणांचा मृत्यू

CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात १००१ रुग्ण वाढीसह ५२ जणांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात शनिवारी एक हजार एकने वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या पाच लाख आठ हजार ६४७ झाली आहे. आज ५२ जाणांच्या मृत्यूने आता एकूण मृतांची संख्या आठ हजार ८२० नोंदली गेली आहे. 

     जिल्ह्यात आढळून आलेल्या या रुग्ण संख्येपैकी  ठाणे महापालिका क्षेत्रात १८८ रुग्ण सापडल्याने आता येथील रुग्ण संख्या एक लाख २७ हजार ६४३ झाली आहे. तर पाच रुग्ण दगावल्याने येथील एकूण मृतांची संख्या एक हजार ८५१ झाली. कल्याण डोंबिवलीत २२० रुग्णांच्या वाढीसह २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात एकूण रुग्ण एक लाख ३१ हजार ४६६ नोंदले असून एक हजार ८१३ मृतांची नोंद झाली आहे.

       उल्हासनगरात १६० रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथील २० हजार ५८ रुग्णांसह ४६५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीला १३ रुग्ण आढळले असून एक मृत्य झाला. येथील रुग्ण संख्या आता १० हजार ३४६ झाली असून मृतांणी संख्या ४२९ नोंद झाली. मीरा भाईंदर परिसरात ११८ रुग्ण वाढीसह आठ जण दगावले आहेत. येथील एकूण रुग्ण संख्या ४७ हजार ९४० बाधीतसह  एक हजार २३९ मृत्यू नोंद झाले आहेत.

       अंबरनाथ परिसरा १९ बाधितांसह एकही मृत्यू नाही. येथे आता १९ हजार ९० बाधितांसह ४०१ मृत्यू नोंदवले. कुळगांव बदलापूरला ४४ बाधीत आढळले असून एकही मृत्यू नाही. आता २० हजार ३१६ बाधीत झाले असून २३३ मृत्यू नोंद झाले आहेत. गांवपाड्यात ११३ बाधीत आढळल्यामुळे रुग्ण संख्या आता ३४ हजार ६४५ नोंद झाली. सात जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ८३८ झाली आहे.

Web Title: CoronaVirus in Thane: 52 deaths in Thane district with an increase of 1001 corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.