Coronavirus in Thane: ठाणे जिल्हा रुग्णालयात आणखी ८० खाटांची सोय; कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 01:21 AM2020-05-08T01:21:31+5:302020-05-08T01:21:45+5:30
पंकज रोडेकर ठाणे : जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात जिल्हा रुग्णालयात खाटांची ...
पंकज रोडेकर
ठाणे : जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात जिल्हा रुग्णालयात खाटांची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने रुग्णालयात आणखी ८० खाटांची व्यवस्था चालविली आहे. या वाढीव खाटांसह ते २५० खाटांचे होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची केबिन असलेल्या इमारतीतील काही विभाग परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची वाढत आहे. ६ मेपर्यंत एक हजार ५१३ रुग्ण आढळले असून ४२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ३९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.मध्यंतरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाची कोविड १९ चे विशेष रुग्णालय म्हणून नाव घोषित केले. तेव्हापासून म्हणजे जवळपास दीड महिना या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत ३०१ जणांना उपचारार्थ दाखल केले असून यामध्ये २३४ जण हे पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहेत.
सध्या पुढे येत असलेले रुग्ण लक्षात घेऊन या व्यवस्थेची तयारी केली आहे. येणाऱ्या रुग्णांना येथे दाखल करून तातडीने उपचार दिले जाणार आहेत. - डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय
ठाणे रेल्वेस्थानकातून सुटली पहिली ‘श्रमिक’ ट्रेन
ठाणे : भिवंडी, कल्याण या रेल्वेस्थानकांतून श्रमिक ट्रेन सोडल्यानंतर गुरुवारी ठाणे रेल्वेस्थानकातून तब्बल ४५ दिवसांनी मोतीहार (पाटणा) येथे पहिली श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. यावेळी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करून जिल्हा प्रशासनाने ठाणे आणि वागळे इस्टेट परिमंडळातील १२०० मजुरांना निरोप दिला. मूळगावी परत जात असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या टीमने गुरुवारी सकाळपासून या ट्रेनचे नियोजन केले होते.
यावेळी जिल्हा व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन गाडी पूर्णपणे सॅनिटाइज करून प्रत्येक प्रवाशाने चेहºयावर मास्क किंंवा रुमाल घातला असल्याची खात्री करून घेतली होती. तसेच प्रवासादरम्यान त्यांची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे पाहण्यास मिळाले.
५५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर, नऊ जणांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. १०१ जण रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १२५ जण उपचार घेत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सध्याच्या असलेल्या १७५ ते १८० खाटांमध्ये आणखी ८० खाटा वाढवण्यावर विशेष भर दिला. यासाठी तेथील काही विभाग रुग्णालयाच्या समोर असलेल्या परिचारिका प्रशिक्षण इमारतीत हलवले आहेत तसेच काही विभाग हे रुग्ण दाखल केल्यावर हलवले जाणार आहेत. ही खबरदारी वाढत्या रुग्णांमुळे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २० नवे रुग्ण; दोन महिन्यांची बालिका, डिलिव्हरी बॉयलाही लागण
केडीएमसी हद्दीत गुरुवारी कोरोनाचे २० रुग्ण आढळले असून, हा आतापर्यंत एका दिवसांतील रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील दोन महिन्यांची बालिका आणि कल्याण पूर्वेतील ३२ वर्षांचा आॅनलाइन फूड डिलिव्हरी बॉयही आहे. बालिका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने तिला संसर्ग झाला आहे. दरम्यान, महापालिका हद्दीत एकूण रुग्णांची संख्या २५३ झाली आहे. कल्याण पूर्वेतील दोन आणि पश्चिमेतील एक अशा तीन पोलिसांनाही संसर्ग झाला आहे.
कल्याण पूर्वेतील दोन व कल्याण पश्चिमेतील एक असे तीन आरोग्य खात्यातील कर्मचारी, पश्चिमेत राहणारा खाजगी कंपनीतील कर्मचारी, आंबिवलीत राहणारा तरुण, डोंबिवली पूर्वेत राहणारा परंतु, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी असलेला अशा नऊ जणांना कोरोना झाला आहे. हे सर्व जण मुंबईत कामाला आहेत.