Coronavirus in Thane: ठाणे महापालिकेने तयार केला कंटेनमेंट प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 06:21 AM2020-05-07T06:21:14+5:302020-05-07T06:21:22+5:30
कोरोनाग्रस्तांचा घेतला जातोय आढावा : रोजच्या रोज आराखड्यात होतोय बदल
ठाणे : ठाणेमहापालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी कंटेनमेन्ट प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीमधून रोज किती जणांना कोरोनाची लागण झाली, किती बरे झाले, किती जणांचा मृत्यू झाला, १४ दिवसांचा कालावधी किती जणांनी पूर्ण केला याची सर्व खबरदारी महापालिका घेत आहे. यात रुग्णांची संख्या कमी झाली तर त्या प्रभाग समितीमधील काही भाग हे अॅक्टिव्ह झोन म्हणून कार्यरत केले जात आहेत.
प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कोणत्या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. कोणत्या भागात रुग्णांची संख्या कमी आहे, त्यानुसार रोजच्या रोज या प्लॅनमध्ये बदल केले जात आहेत. ठाणे शहरात आजघडीला ४४९ च्या आसपास कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. त्यातील १८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये लोकमान्य- सावरकर नगर आणि मुंब्य्रात प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही ९४ असून ३३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे नऊ नवे रुग्ण
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बुधवारी कोरोनाचे नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईत कार्यरत असलेल्या चार पोलिसांचा समावेश असून, महापालिका हद्दीत सापडलेल्या रुग्णांची संख्या २३३ वर गेली आहे. कल्याण पश्चिमेतील ४३ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, तर कल्याण पूर्वेतील ३४ वर्षीय पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. हे तिघेही मुंबईत पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुंबईत वाहतूक शाखेत काम करणाºया ३७ वर्षीय पोलिसालाही लागण झाली आहे.
कल्याण पूर्वेत राहतात. कल्याण पूर्वेतील २८ वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. ती मुंबईतील सरकारी सेवेत सुरक्षारक्षकाचे काम करते. ठाण्यात एका खाजगी कंपनीतील ३२ वर्षीय तरुणाला व महापे येथे काम करणाºया ३३ वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील ४४ वर्षीय महिला आणि ३० वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील ७६ जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.