Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४७९ रुग्ण वाढीसह १४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:02 PM2021-07-09T21:02:32+5:302021-07-09T21:03:00+5:30

Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली असून १४ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३६ हजार ९२८ रुग्णांची व दहा हजार ८०३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus: In Thane district, 14 people died with 479 cases of corona | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४७९ रुग्ण वाढीसह १४ जणांचा मृत्यू

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४७९ रुग्ण वाढीसह १४ जणांचा मृत्यू

Next

ठाणे - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली असून १४ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३६ हजार ९२८ रुग्णांची व दहा हजार ८०३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरात आढळलेल्या १०० रुग्ण आढळले आहे. आज दिवसभरात चार मृत्यू झाले आहे. यासह शहरातील बाधितांची संख्या एक लाख ३४ हजार २३९ झाली आहे. तर मृतांची संख्या दोन हजार ३४ नोंदली गेली. कल्याण डोंबिवलीत १०३ बाधीत असून दोन मृत्यू आढळले आहे.  या शहरात एक लाख ३७ हजार‌ ३६० बाधितांसह दोन हजार ६०८ मृतांची नोंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये १० बाधीत व दोन मृत्यू झाले आहे. यासह शहरात २० हजार ८६७ बाधितांसह ५२२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीत पाच बाधीत असून मृत्यू आढळला नाही. यासह या शहरातील दहा हजार ६५० बाधितांसह ४६० मृत्यू नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला ७२ बाधीत असून मृत्यू नाही. या शहरातील ५० हजार ९९९ बांधिता व एक हजार ३४२ मृत्यूची नोंद झाली आहे.

अंबरनाथमध्ये १८ बाधीत व एक मृत्यू आहे . यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार ८७९ व मृतांची संख्या ५१८  नोंदली गेली आहे. कुळगांव बदलापूर शहरात २० बाधीत सापडले. यासह येथील बाधीत २१ हजार २९४ तर मृत्यू एक आहे. एकूण ३४८ मृतांची नोंद झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४२ बाधीत सापडले असून दोन मृत्यू झाले आहे. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आजपर्यंत ३९ हजार ८१० बाधितांची व एक हजार १९२ मृतांची नोंद झाली आहे.

Web Title: Coronavirus: In Thane district, 14 people died with 479 cases of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.