CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:36 AM2020-06-26T04:36:13+5:302020-06-26T04:36:47+5:30

ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.

CoronaVirus: Thane district, 40 people including 1473 victims died | CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी १४७३ बाधितांची तर ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार १४७ तर मृतांची ८८१ झाली आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल ३२३ रुग्ण आढळले असून ठाण्यात २६४ नवीन रुग्ण आढळले आहेत.
गुरुवारी कल्याण डोंबिवलीत तब्बल ३२३ रु ग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे तेथील बाधितांची संख्या सहा हजार ५१५ तर मृतांची ९१ इतकी झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.
नवी मुंबईत २३६ रु ग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्या त्यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात १६४ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर मृतांची ९१ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये १६२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ७३५ तर मृतांची संख्या १२४ इतकी झाली आहे. उल्हासनगर येथे १२९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३६ झाली आहे.
अंबरनाथमध्ये ७१ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली असून दोघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ३६ झाली आहे. बदलापूरमध्ये ३१ रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ६४९ तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ९३ रु ग्णासह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ११४९ तर मृतांची ३६ वर गेली आहे.
>वसई-विरारमध्ये १८९ रुग्ण
वसई : वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक १८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत या मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०१ झाली आहे. तर २० रुग्णांनी आजारावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६४२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १०९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
>नवी मुंबईत २३६ रुग्ण वाढले
नवी मुंबई : शहरात गुरूवारी २३६ नवीन रूग्ण वाढले असून ९ जणांचा मृत्यू झाला. तर १०२ जण बरे झाले आहेत. नवी मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ५, ६२९झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३१८८ झाली आहे.
>रायगडमध्ये १६० रु ग्ण : अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी १६० पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली असून,बाधित रु ग्णांची संख्या २९०६ वर पोहोचली आहे. तर, ४८ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ९०२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: CoronaVirus: Thane district, 40 people including 1473 victims died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.