coronavirus: ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवार ठरला आंदोलनाचा, भरपावसातही उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:23 AM2020-08-30T01:23:38+5:302020-08-30T01:25:57+5:30

मंदिरे सुरू करण्यासाठी सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याने भाजपने शनिवारी मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.

coronavirus: In Thane district, there was agitation on Saturday, even in the rainy season | coronavirus: ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवार ठरला आंदोलनाचा, भरपावसातही उत्साह

coronavirus: ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवार ठरला आंदोलनाचा, भरपावसातही उत्साह

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सरकारने मिशन बिगेनअंतर्गत मॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र मंदिरे सुरू करण्यासाठी सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याने भाजपने शनिवारी मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून पावसानेही हजेरी लावली असूनही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. तसेच जेईई, नीट परीक्षा रद्द करण्यासाठीही राष्ट्रवादीने आंदोलन केले.

ठाणे - राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने शनिवारी केलेल्या घंटानादाने ठाणे शहर दुमदुमले. ठाण्यातील प्रमुख देवस्थान कौपिनेश्वर मंदिर परिसराबरोबरच शहराच्या विविध भागांतील २८ मंदिरांबाहेर भाजप कार्यकर्ते, आध्यात्मिक आघाडीसह भाविकांनी दार उघड उद्धवा, दार उघड अशा घोषणांचा गजर करून घंटानाद केला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील आंदोलनाचे नेतृत्व केले. कौपिनेश्वर मंदिराबाहेरील आंदोलनाला नगरसेवक संदीप लेले, सुनेश जोशी, नम्रता कोळी आदींचीही उपस्थिती होती.
महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली गावदेवीमाता मंदिरासमोर टाळ वाजवून घंटानाद केला. यावेळी प्रशांत कळंबटे, अमित पेडणेकर, विनय राऊत आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. हिरानंदानी इस्टेट येथील श्री सिद्धिविनायक मंदिराबाहेर नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका कमल चौधरी, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. चंदनवाडी येथील सिद्धिविनायक मंदिर व राम मंदिराबाहेर झालेल्या आंदोलनांत ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, नारायण पवार, भाऊ दामले, संतोष साळुंखे, किशोर गुणीजन, रूपेश कारंडे, भरत पडवळ, महेश विनेरकर आदींचा सहभाग होता. लोकपुरम मंदिराबाहेर नगरसेवक मुकेश मोकाशी, स्रेहा आंब्रे, रमेश आंब्रे, संतोष जैस्वाल यांनी आंदोलन केले. ठाणे शहरातील २८ ठिकाणी आंदोलने करण्यात आली.
भाजपच्या नौपाडा मंडल समितीत ५, मध्य मंडल व कळवा मंडल भागात प्रत्येकी ४, घोडबंदर रोड व दिवा भागात प्रत्येकी ३, लोकमान्यनगर, वर्तकनगर व रायलादेवी भागात २, मुंब्रा, कोपरी आणि वागळे इस्टेट भागात एका ठिकाणी टाळांच्या गजराबरोबरच घोषणांमध्ये घंटानाद करण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

‘भावनांशी खेळू नका’
उल्हासनगर : शहरातील मंदिरे, सिंधी धार्मिक देवस्थाने उघडण्यासाठी भाजपने घंटानाद केला. आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदी सहभागी झाले होते. झुलेलाल, चालिया मंदिर, मोहटादेवी, हनुमान मंदिर येथे घंटानाद केला. केंद्र सरकारच्या निर्देशानंतरही मंदिरे न उघडता भाविकांच्या भावनांशी खेळले जात असल्याची टीका आमदार आयलानी यांनी केली. भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी केली.

‘सरकारकडूनच विलंब’
अंबरनाथ : शहरातील विविध भागांतील मंदिरांसमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांसह घंटानाद केला. राज्यात मद्य, मॉल सुरू करण्यास सरकारकडून परवानगी दिली जाते, मग मंदिरांची दारे उघडण्यासाठी सरकार विलंब का लावत आहे, असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सरचिटणीस दिलीप कणसे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष खानजी धल, विश्वास निंबाळकर, भगवान सोलंकी, दीपक कोतेकर, संतोष शिंदे, श्रीकांत रेड्डी, महिला मोर्चा आघाडीच्या मंजू धल, उज्ज्वला कबरे, कृष्णाबा सिसोदिया, शिवशंकर रेड्डी आदी उपस्थित होते.

निद्रिस्त सरकार जागे व्हा, देवालये सुरु करा


डोंबिवली : भाजपच्या आध्यात्मिक प्रकोष्ठतर्फे देवालये दर्शनाकरिता उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी डोंबिवली, कल्याण, टिटवाळा तसेच २७ गावांमध्ये पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्याचा प्रारंभ शहरातील श्री गणेश मंदिर संस्थान येथे झाला.
मंदिरे उघडावीत, अशी नागरिकांची भावना असून, भाजप तीच मांडत आहे. लॉकडाऊन देशभरात शिथिल झालेले असताना राज्य सरकार मात्र निद्रिस्त असल्याचे सोंग घेत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन केले आहे. २३ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने गुढीपाडव्यापासून गणेशोत्सवापर्यंत सर्व सण, उत्सव, व्रतवैकल्ये घरातून तसेच साधपणे झाली. पण, आता पुरे झाले. राज्य सरकारने आता देवालये सुरू करावीत, यासाठी हे आंदोलन केल्याचे ते पुढे म्हणाले. ठाणे जिल्ह्यात ७० तर, संपूर्ण कोकण भागात ७०० ठिकाणी हे आंदोलन झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
डोंबिवलीतील आंदोलनप्रसंगी केडीएमसीतील विरोधी पक्षनेते व गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, विश्वस्त अच्युत कºहाडकर, नगरसेविका खुशबू चौधरी, मुकुंद पेडणेकर, शशिकांत कांबळे, नंदू जोशी, सचिन कटके आदींसह कार्यकर्ते भाविक उपस्थित होते.
दरम्यान, कल्याणमध्येही आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, टिटवाळा येथे माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, २७ गावांमध्ये माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, मनीषा राणे यांच्यातर्फे घंटानाद आंदोलने केली.

भरपावसात आरती, आंदोलने
कल्याण-डोंबिवलीत शनिवारीही पावसाचा जोर होता. त्यामुळे अनेक ठिकाणी भरपावसात भाजपने घंटानाद आंदोलने केली. तसेच गणपतीची आरती म्हटली. दरम्यान पाऊस, आरोग्याची काळजी घेऊन तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून हे आंदोलन करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले होते.
 

Web Title: coronavirus: In Thane district, there was agitation on Saturday, even in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.