CoronaVirus in Thane जिल्ह्यात 74 नव्या रुग्णांची भर; आणखी दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 08:43 PM2020-05-03T20:43:08+5:302020-05-03T20:44:15+5:30
शनिवारी जिल्ह्यात सर्वाधिक 97 रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर रविवारी 74 रुग्ण आढळले आहेत.
ठाणे: जिल्ह्यात रविवारी ही 74 नव्या रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही एक हजार 183 झाली आहे. तसेच रविवारी आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या ही 33 वर पोहोचली आहे. तर नवीमुंबईत सापडलेल्या नव्या 25 रुग्णांमुळे त्या महापालिकेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी 300 चा आकडा पार केला असून एकूण संख्या 314 वर झाली आहे. तसेच रविवारी अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
शनिवारी जिल्ह्यात सर्वाधिक 97 रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर रविवारी 74 रुग्ण आढळले आहेत.नव्या रुग्णांमध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील एकूण रुग्ण संख्या ही 389 झाली आहे. नव्या सापडलेल्या रुग्णांमध्ये 10 पुरुष रुग्ण असून उर्वरीत 7 महिला रुग्ण आहेत. त्यामध्ये दिव्यात चार रुग्ण मिळून आले आहेत. त्याचबरोबर ठामपा हद्दीत 13 जणांना घरी सोडले असून त्यांची एकूण संख्या 87 झाली असून 286 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर कल्याण डोंबिवलीत 14 नवीन रुग्ण आढळून असून तेथील एकूण रुग्ण संख्या 195 झाली आहे. तर पाच जणांना डिस्चार्ज दिल्याने आतापर्यंत 65 जण घरी परतले आहेत. तर नव्या रुग्णांमध्ये कल्याणात 9 तर डोंबिवलीतील 5 रुग्णांचा समावेश आहे. तर नवीमुंबईत सर्वाधिक 25 रुग्ण सापडले आहेत.
ठाणे ग्रामीणमध्ये ही 8 रुग्ण मिळून आल्याने एकूण संख्या ही आता 39 झाली आहे. तर मिराभाईंदरमध्ये सापडलेल्या 6 रुग्णांमुळे एकूण रुग्ण संख्या 171 वर पोहोचली आहे. भिवंडी आणि बदलापूर येथे प्रत्येकी 2 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या अनुक्रमे 18 आणि 37 झाली आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही रुग्ण आढळून आला नसल्याने तेथील संख्या प्रत्येकी 10 असल्याची माहिती ठाणे आरोग्य विभागाने दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी
CoronaVirus वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार; पुरेसे पुरावे सापडल्याचा अमेरिकेचा दावा
खूशखबर! मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार; ई-कॉमर्सला मान्यता
कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट
आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप