CoronaVirus in Thane: जिल्ह्यात कोरोनाचे ५१६७ रुग्णांची नव्याने वाढ; १८ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:38 PM2021-04-08T22:38:12+5:302021-04-08T22:47:52+5:30

CoronaVirus in Thane: ठाणे शहरात एक हजार ८२९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९०  हजार ७३७ रुग्ण नोंदले असून आज सात मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४८७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार २२४ रुग्ण आढळून आले असून चार  मृत्यू आहे.

CoronaVirus in Thane: New increase of 5167 corona patients in the district; 18 died | CoronaVirus in Thane: जिल्ह्यात कोरोनाचे ५१६७ रुग्णांची नव्याने वाढ; १८ जणांचा मृत्यू 

CoronaVirus in Thane: जिल्ह्यात कोरोनाचे ५१६७ रुग्णांची नव्याने वाढ; १८ जणांचा मृत्यू 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १६७ रुग्णांची गुरुवारी नव्याने वाढ झाली आहे.  तर १८ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या तीन लाख ६१ हजार ४३४ झाली असून सहा हजार ६३८ मृतांची संख्या झाली आहे. 
         ठाणे शहरात एक हजार ८२९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९०  हजार ७३७ रुग्ण नोंदले असून आज सात मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४८७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार २२४ रुग्ण आढळून आले असून चार  मृत्यू आहे. या शहरात आता८९  हजार ७५८ बाधीत असून एक हजार २८२ मृत्यूची नोंद आहे.
        उल्हासनगरला १७७ रुग्ण शोधले असून मृत्यू नाही. आता या शहरात १५ हजार ३३१ बाधीत असून मृत्यू संख्या ३८५ आहे. भिवंडीला २६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे सात हजार ३९९ बाधितांसह ३६७ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ४०१ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू आहे. या शहरात आता ३३ हजार ७७७ बाधितांसह ८४७ मृतांची संख्या झाली आहे. 
 
            अंबरनाथला २६५ रुग्ण सापडले आहे. तर, एक मृत्यू आहे. या शहरात आता १२ हजार ७८५ बाधितांसह मृतांची संख्या ३२२ नोंदली आहे. बदलापूरला १९० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १४ हजार ८३ असून एकही मृत्यू नाही. आता मृत्यूची संख्या १२६ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १४४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत २१ हजार ७८५ बाधीत झाले असून मृत्यू ६१६ आहे.

Web Title: CoronaVirus in Thane: New increase of 5167 corona patients in the district; 18 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.