CoronaVirus: धक्कादायक! ठाण्यातील डॉक्टरला कोरोनाची लागण; काजूवाडीमध्ये क्लिनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 04:00 PM2020-04-02T16:00:03+5:302020-04-02T19:11:02+5:30

CoronaVirus in Thane: मंगळवारी जसलोकमध्ये कोरोनाची लागण झालेली पहिली नर्स सापडली होती. यानंतर त्या वॉर्डमधील सातही नर्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

CoronaVirus in Thane: Shocking! Thane's kajuwadi doctor got corona Positive hrb | CoronaVirus: धक्कादायक! ठाण्यातील डॉक्टरला कोरोनाची लागण; काजूवाडीमध्ये क्लिनिक

CoronaVirus: धक्कादायक! ठाण्यातील डॉक्टरला कोरोनाची लागण; काजूवाडीमध्ये क्लिनिक

Next

ठाणे  : मागील दोन दिवसात ठाण्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे ठाणोकरांना थोडासा दिलासा देणारी बातमी होती. परंतु आता ठाण्यात एका डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला उपचारार्थ ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु आता त्याच्या दवाखान्यात मागील तीन ते चार दिवसात किती रुग्ण येऊन गेले याची माहिती आता पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत काढली जात आहे. कळवा येथे आणखी रुग्ण आढळला आहे.

तसेच त्याची पत्नी आणि मुलाला आता होम क्वॉरान्टाइन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या डॉक्टराची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला ही बाधा झाली असावी अशी शक्यताही वर्तविली जात असून त्यानुसार तो रुग्ण कोण, तो कुठे आहे, याचा शोध सुरु झाला असून त्यामुळे ठाणेकरांच्या चितेंत भर पडली आहे.


ठाण्यातील कोरोनाची परिस्थिती सध्या इतर शहरांच्या तुलनेत बरी होती. परंतु आता ठाण्यासाठी चिंतेची गोष्ट निर्माण झाली आहे. ठाण्यात आतार्पयत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही 12 एवढी होती. त्यात गुरुवारी सकाळी आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. काजुवाडी भागात दवाखाना चालवित असलेल्या एका डॉक्टरालाच कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या डॉक्टर रुग्णाला कस्तुरबा येथे हलविण्याच्या बुधवारी रात्री सुरु होत्या. नंतर त्याला मोठय़ा खाजगी रुग्णालयात जाण्यासही सांगण्यात आले होते. परंतु तेथे बेड उपलब्ध नसल्याने अखेर गुरुवारी सकाळी त्याला ठाणे  जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या डॉक्टरची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने त्याला याची लागण कशी झाली याचा शोध आता पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला आहे. सदर डॉक्टरची दवाखाना हा काजुवाडीत असून, मागील चार ते पाच दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची शोध मोहीम पालिकेने सुरु केली आहे. यासाठी या भागातील सीसीटीव्ही कॅमे:यांची मदतही घेतली जात असल्याची माहिती डॉ. आर. टी केंद्रे यांनी दिली. या डॉक्टरला ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने एखादा कोरोना बाधीत रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी आला होता का? याचाही माहिती घेण्याचे काम आता सुरु झाले आहे. तसे असेल तर तो रुग्ण सध्या कुठे आहे, याचाही तपास आता केला जात आहे. दुसरीकडे संबधीत डॉक्टरची पत्नी आणि मुलालाही मानपाडा येथील त्यांच्या घरातच होम क्वॉरान्टाईन करण्यात आल्याचेही केंद्रे यांनी सांगितले. तसेच त्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus in Thane: Shocking! Thane's kajuwadi doctor got corona Positive hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.