CoronaVirus News: गुड न्यूज! रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर राज्यात पहिल्या, तर देशात दुसऱ्या क्रमाकांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:38 PM2020-08-19T16:38:53+5:302020-08-19T16:39:18+5:30
CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं उचललेल्या पावलांना यश
ठाणे : ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 89 टक्यांवर आले असून राज्याचा एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के असून ठाणे शहर हे राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर देशात ठाणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. सध्याच्या घडीला ठाण्यात 20 हजार 989 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही 1885 एवढी आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही 90 दिवसांवर आले आहे.
ठाणे शहरात मार्च महिन्यापासूनच कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. त्यानंतर मे, जूनमध्येही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दुपटीने वाढली होती. त्यानंतर टप्याटप्याने ऑनलॉक जाहीर झाला होता. परंतु ठाणो महापालिकेच्या माध्यमातून या कालावधीतही दोन वेळा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळेस पालिका आणि सत्ताधाऱ्यांवर देखील विरोधकांनी टिकेची झोड उठविली होती. परंतु त्याचे परिणाम आता दिसत असून शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिका हद्दीत आजर्पयत 23 हजार 632 रुग्ण हे कोरोनाचे आढळले आहेत. तर मंगळवार्पयत यातील 20 हजार 989 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतार्पयत 758 रुग्णांची मृत्यू झाला आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या 1885 एवढी आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणो महापालिकेच्या माध्यमातून शहरात करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोवीड केअर सेंटर हे 1024 बेडचे रुग्णालयही ठाणेकरांसाठी आणि गोरगरीब रुग्णांसाठी फायदेशीर ठरले आहे. तसेच झोपडपटटीतील कोरोना रोखण्यासाठी घरोघरी जाऊन ताप सव्र्हेक्षण करणो, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करणे, 1 व्यक्तीला कोरोना झाला तर त्याच्या संपर्कातील 20 जणांना तत्काळ क्वॉरन्टाइन केले जात आहे. यासह इतर उपाय योजनांमुळे आज शहरात कोरोना बाधीत रुग्णांची रोजची संख्या 400 वरुन 144 र्पयत खाली आली आहे.
दुसरीकडे पालिकेने केलेल्या या उपाय योजनांमुळे आणि मुंब्रा, वागळे, लोकमान्य नगर आदींसह इतर भागात राबविलेल्या विविध स्वरुपाच्या पॅटर्नमुळे झोपडपटटीतील कोरोना रोखण्यात पालिकेला यश आले आहे. दरम्यान एकूणच देशातील इतर शहारांचा विचार केला किंवा राज्यातील इतर शहरांतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहिले असल्यास देशात दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 90 टक्के आहे. तर महाराष्ट्र राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 71 टक्के आहे. तर राज्यातील इतर शहरांचे प्रमाणही ठाण्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. एकूणच यामुळे राज्यात ठाणे शहर पहिल्या तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे ठाणो पॅटर्न हा राज्य आणि देशाला आदर्श ठरणार आहे.
पालकमंत्री आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे ठाणो शहराने कोरोनावर यशस्वी मात करण्यास सुरवात केली आहे. डॉक्टर, नर्सेस इतर स्टाफ, शिक्षक आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच कोरोना रोखण्यात यश आले आहे. परंतु नागरीकांनी आजही सोशल डिस्टेसींगचे पालन करावे, कोरोना संपला असे वाटून घेऊ नये, त्याला रोखता कसे येईल यासाठी प्रत्येक ठाणेकराने दक्षता घेणो गरजेचे आहे. - नरेश म्हस्के, महापौर, ठामपा
शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
ठाणे - 89 टक्के
नवीमुंबई - 82
कल्याण - डोंबिवली - 85
पूणे महापालिका - 78
मुंबई - 81
दिल्ली राज्य - 90
महाराष्ट्र राज्य -71