Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवे २,८६९ रुग्ण; बाधित रुग्णसंख्या २० हजार ५८३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:02 AM2021-03-25T01:02:56+5:302021-03-25T01:03:13+5:30
ठाणे शहर परिसरात ७९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ७१ हजार १० झाली आहे. शहरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या एक हजार ४३२ झाली आहे
ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी दोन हजार ८६९ नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ९६ हजार २३ रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ४१३ झाली आहे. शहरी भागात कोरोनाची लाट आली असून ठाणे शहरात ७९३, कल्याण-डोंबिवलीत ८८१ आणि नवी मुंबईत ५१९ रुग्ण वाढले आहेत.
ठाणे शहर परिसरात ७९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ७१ हजार १० झाली आहे. शहरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या एक हजार ४३२ झाली आहे. पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही संख्या वाढतेच असून बुधवारी याठिकाणी ८८१ रुग्णांची वाढ झाली असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ५१९ रुग्णांची वाढ झाली असून तिघांच्या मृत्यूची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये ७१ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ४३ बाधित असून एकही मृत्यूची नोंद नाही. मीरा-भाईंदरमध्ये १८० रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १०८ रुग्ण आढळले आहे. बदलापूरमध्ये १५९ रुग्णांची नोंद झाली.
ठाणे ग्रामीणमध्ये ११५ नवे रुग्ण वाढले आहेत तर एकाच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या २० हजार ५८३ झाली असून आतापर्यंत ६०३ मृत्यूंची नोंद झाली आहे.