CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५६ नवे रुग्ण; ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:57 PM2021-05-25T20:57:30+5:302021-05-25T20:59:18+5:30

CoronaVirus Thane Updates : ठाणे मनपाच्या परिसरात १३१ रुग्ण आढळून आले. यासह येथील रुग्ण संख्या एक लाख २८ हजार १०० झाली.

CoronaVirus Thane Updates: 656 new corona patients in Thane district in last 24 hours | CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५६ नवे रुग्ण; ४० जणांचा मृत्यू

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५६ नवे रुग्ण; ४० जणांचा मृत्यू

Next

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येत ६५६ जणांची मंगळवारी वाढ झाली असून ४० रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ११ हजार ६६५ रूग्णांसह मृतांची संख्या आठ हजार ९६३ नोंदली गेली आहे.

ठाणे मनपाच्या परिसरात १३१ रुग्ण आढळून आले. यासह येथील रुग्ण संख्या एक लाख २८ हजार १०० झाली. या शहरात पाच बाधीत दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ८६५ झाली आहे. कल्याण डोंबिवली शहरात १०२ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या एक लाख ३२ हजार ६ झाली. दिवसभरातील १६ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ५६९ मृत्यू नोंदवण्यात आले आहे.

उल्हासनगरला ५२ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू झाले. आता येथील रुग्ण संख्या २० हजार १४५ झाली असून ४६७ मृतांची संख्या नोंद केली आहे. भिवंडीला दिवसभरात १४ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले आहे. येथील एकूण रुग्ण १० हजार ३९८ झाले असून मृत्यू ४३४ नोंदली. मीरा भाईंदरला ११३ रुग्णांची वाढ होऊन सहा मृतांची वाढ झाली आहे. आता येथील रुग्ण संख्या ४८ हजार ३३६ झाली असून एक हजार २५६ मृतांची नोंद झाली आहे.   

अंबरनाथला १४ रुग्णांच्या वाढीसह एकही मृत्यू नाही.येथील रुग्ण संख्या आता १९ हजार १५५ झाली असून ४०३ मृतांची नोंद झाली आहे. कुळगांव बदलापूरमध्ये २२ रुग्णांची भर पडली आहे. आज मात्र एकही मृत्यू नाही. आता येथील २० हजार ४१५ रुग्णांसह २४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये १०१ रुग्ण आढळून असून तीन जण दगावले. या परिसरात आजपर्यंत ३५ हजार ६३४ रुग्णांची वाढ होऊन ८५२मृतांची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: CoronaVirus Thane Updates: 656 new corona patients in Thane district in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.