CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ७६४ रुग्ण वाढीसह ५० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:29 PM2021-05-28T22:29:34+5:302021-05-28T22:39:09+5:30

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ७६४ रुग्ण वाढीसह ५० जणांचा मृत्यू

CoronaVirus Thane Updates 764 new corona patients in Thane district in last 24 hours | CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ७६४ रुग्ण वाढीसह ५० जणांचा मृत्यू

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ७६४ रुग्ण वाढीसह ५० जणांचा मृत्यू

Next

ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७६४ ने वाढली असून ५० जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख १४ हजार ३३० रुग्णांची व नऊ हजार १११ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरात १५४ रुग्ण आढळले आहे. आज दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यासह शहरातील बाधितांची संख्या एक लाख २८ हजार ५९१ झाली आहे. तर असून मृतांची संख्या एक हजार ८८४ नोंदली गेली. कल्याण डोंबिवलीत १४८ बाधीत व २१ मृत्यू झाल्याचे आढळले आहे. यासह या शहरात एक लाख ३२ हजार‌ ५६७ बाधितांसह एक हजार ९४२ मृतांची नोंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये ४१ बाधीत व एक मृत्यू झाला आहे. यासह शहरात २० हजार २९७ बाधितांना ४७० मृतांची नोंद केल्या गेली आहे. भिवंडीत १३ बाधीत व एकाचा मृत्यू झाल्याचे आढळले. यासह या शहरातील दहा हजार ४३७ बाधितांसह ४३७ मृत्यू नोंद झाले आहेत. मीरा भाईंदरला १४४ बाधीत व पाच मृत्यू झाले आहेत. या शहरातील ४८ हजार ७५७ बाधीत व एक हजार २६६ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये २१ बाधीत व एकही मृत्यू झाला नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार २२५ व मृतांची संख्या ४०५ नोंदली गेली आहे. कुळगांव बदलापूर शहरात ३५ बाधीत सापडले. यासह येथील बाधीत २० हजार ५११ तर मृत्यू २५३ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९९ बाधीत आणि दहा जणांचा आज मृत्यू झाला. यामुळे या ग्रमीण क्षेत्रात आजपर्यंत ३६ हजार १५० बाधितांची व ८६७ मृतांची नोंद केली आहे.

 

Web Title: CoronaVirus Thane Updates 764 new corona patients in Thane district in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.