Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येत समाधानकारक घट; ३२४२ रूग्णांसह ६५ जणांच्या मृत्यूने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:03 PM2021-04-27T22:03:01+5:302021-04-27T22:03:21+5:30
उल्हासनगरला ९१ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. आता या शहरात १८ हजार ४६१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ४१९ झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत मंगळवारही समाधानकारक घट झाली आहे. तब्बल दोन हजार रुग्णांची घट होऊन आज तीन हजार २४२ रुग्ण जिल्ह्यात सापडले. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता चार लाख ५६ हजार ९३१ झाली आहे. तर ६५ जणांच्या मृत्यूने वाढलेली मृतांची संख्या आजपर्यंत सात हजार ४०१ नोंदली आहे.
ठाणे शहरात ७७० रुग्ण सापडले आहेत. या शहरात एक लाख १६ हजार ३९९ रुग्ण नोंद झाले आहेत. आज ११ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ६३२ झाली. कल्याण - डोंबिवलीत ७४९ रुग्ण आढळून आले असून आठ जणांचा मृत्यू झाला. या शहरात आता एक लाख १७ हजार ९७९ बाधीत असून एक हजार ४०२ मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरला ९१ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. आता या शहरात १८ हजार ४६१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ४१९ झाली आहे. भिवंडीला ३२ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे नऊ हजार ७५१ बाधितांची तर, ३८९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला ४५७ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू झाले आहे. या शहरात आता ४२ हजार २५० बाधितांसह एक हजार एक मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरात ११६ रुग्ण सापडले असून पाच मृत्यू झाले आहेत. या शहरात आता १७ हजार ३४९ बाधितांसह मृतांची संख्या ३६६ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये ११९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १८ हजार ५४ झाले असून नऊ मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १७८ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये २४९ रुग्णांचा शोध घेण्यात असून नऊ मृत्यू आज झाले आहे. या गांवपाड्यांत २५ हजार ८४१ बाधीत झाले असून ६७५ जणांचा मृत्यू झालेला आहे.