coronavirus: लॉकडाऊनमध्ये काळ्याबाजाराचा धूर, तंबाखू, गुटखा, सिगारेटची भरमसाट दराने विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 02:42 AM2020-07-07T02:42:00+5:302020-07-07T02:42:18+5:30
सरकारी यंत्रणांनी व पोलिसांनी हा काळाबाजार रोखायचा, त्यांचेच हितसंबंध या साखळीशी जोडले गेल्याने ते गप्प आहेत.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा जिल्ह्यातील सर्वच शहरांत कडक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे तंबाखू, गुटखा, सिगारेट इतकेच काय मद्याचा काळाबाजार करणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनास झाला आहे.
मार्च ते जूनदरम्यान जेव्हा लॉकडाऊन सुरू होता, तेव्हा पाच रुपयांची तंबाखूची पुडी ६५ ते ७० रुपयांना विकली जात होती तर गुटख्याची पुडीही ७५ रुपयांना विकली गेली. पुन्हा तेच सुगीचे दिवस येणार याच कल्पनेने विक्रेते खूश झाले आहेत. मद्याच्या बाटल्या दहापट दराने विकल्या जात होत्या. आता पुन्हा उखळ पांढरे होणार या कल्पनेने वाइनशॉपमालक आनंदून गेले आहेत. ज्या सरकारी यंत्रणांनी व पोलिसांनी हा काळाबाजार रोखायचा, त्यांचेच हितसंबंध या साखळीशी जोडले गेल्याने ते गप्प आहेत. किंबहुना कडक लॉकडाऊन लागू करण्यातील अनेकांच्या हितसंबंधांपैकी हा काळाबाजार हेही एक निमित्त आहे.
लॉकडाऊन जाहीर होणार, असे वातावरण काही राजकीय नेते व किरकोळ धान्यविक्रेते निर्माण करीत होते. कारण भीतीपोटी लोक मोठ्या प्रमाणावर धान्यखरेदी करतील. शिवाय, गोरगरिबांना वाटण्यासाठी सामाजिक संस्था धान्याची खरेदी करतात हा अनुभव गाठीशी असल्याने तोही हेतू होता. लॉकडाऊन उठल्यानंतर उबेरचा एक चालक म्हणाला की, लॉकडाऊन जाहीर होताच त्याने त्याच्याकडील ६५ हजार रुपयांतून तंबाखू, गुटख्याच्या पुड्या खरेदी केल्या. मार्च ते जूनदरम्यान त्याची विक्री करून पावणेदोन लाख रुपये कमावले. भिवंडीच्या गोदाम परिसरातून गुटखा, तंबाखू, सिगारेट आणून विकल्याचे त्याने सांगितले.
महागिरी, लोकमान्यनगर, मुंब्रा येथे सर्रास सिगारेट, तंबाखूची विक्री होत आहे. सहा रुपयांची तंबाखूची पुडी लॉकडाऊनच्या पहिल्या दोन दिवसांत २५ रुपयांवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत ती ५० रुपयांपर्यंत जाईल, असे काळाबाजार करणारे सांगत आहेत. ९५ रुपयांचे सिगारेटचे पाकीट लागलीच १२० ते १५० रुपये मोजल्याखेरीज मिळत नाही. तंबाखूजन्य पदार्थांचा उघड उघड काळाबाजार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाण्यातील खारकर आळी, महागिरी, जांभळीनाका या भागातील घाऊक विक्रीच्या दुकानांबाहेर तंबाखू आणि सिगारेटची विक्री करणारे काही विक्रेते असतात. नेहमीच्या किरकोळ आणि मोठ्या विक्रेत्यांनाच ते सिगारेट आणि तंबाखू उपलब्ध करून देतात.
लॉकडाऊनपूर्वी म्हणजे २२ मार्चपूर्वी एका नामांकित कंपनीचे सिगारेटचे पाकीट ९५ रुपयांमध्ये मिळायचे. लॉकडाऊननंतर ते २०० रुपयांमध्ये मिळू लागले. लॉकडाऊन काही अंशी शिथिल झाल्यानंतर तेच पाकीट पुन्हा ९५ रुपयांऐवजी १२५ रु पयांना विकले जाऊ लागले. याचा अर्थ वस्तूची किंमत एका फटक्यात बºयाच रकमेने वाढवण्याची किमया लॉकडाऊनमध्ये घडली.
आणखी एका सिगारेटच्या पाकिटाची किरकोळ विक्री किंमत १५० रु पये होती. ते लॉकडाऊनमध्ये २७० ते ३०० रु पयांमध्ये विकले जात होते.
एका नामांकित कंपनीच्या तंबाखूच्या पुडीचा दर आठ रुपयांवरून तो थेट ६० रु पये झाला होता, तर अन्य एका पुडीचा दर सहा रु पयांवरु न ५० रुपयांपर्यंत चढला होता.
अनलॉक झाल्यावरही तीच पुडी २५ रु पयांत विकली जात असल्याची माहिती एका ग्राहकाने दिली. सरकारी यंत्रणांचे हितसंबंध असल्यानेच हा काळाबाजार सुरू असल्याचे तो म्हणाला.
अशी होते विक्र ी : कोपरी, आनंदनगर, वागळे इस्टेट, श्रीनगर आणि लोकमान्यनगर येथील किराणा मालाची दुकाने तसेच पानटपऱ्यांमध्ये मिळणारी तंबाखू तसेच सिगारेटची विक्र ी लॉकडाऊनमध्ये एकदम बंद झाली. सुरु वातीला अजिबात न मिळणारी पुडी आणि सिगारेट नंतर त्याच पानटपरीच्या बाजूला एखाद्या दुचाकीवरील विक्रेता चढ्या दराने विकू लागला. अनोळखी व्यक्तींना या विक्र ीची भनकही लागू दिली जात नाही.
नेहमीचे ओळखीचे गिºहाईक सोबत असेल तरच नवख्या गिºहाइकाला पुडी अथवा सिगारेट पाकीट मिळत होते. गुटख्यावर बंदी असल्याने अनेक ठिकाणी गुटखा दिला जात नाही. पण खूपच खात्रीलायक व्यक्ती असेल तर गुटखाही मिळतो, अशी माहिती एका गुटखा सेवन करणाºयाने दिली. तंबाखूमध्ये काही पुड्या आता अजिबात मिळत नाहीत. किरकोळ कंपन्यांचा गुटखा, तंबाखूच्या पुड्या चढ्या दराने गल्लीबोळातून विकण्यात येत असल्याचे, एका तंबाखू शौकिनाने सांगितले.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये २१ मार्च ते ३० जूनपर्यंत प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाले आणि सुगंधित तंबाखूची विक्र ी आणि साठा केल्याप्रकरणी २० धाडी टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन कोटी ६४ लाख ७४ हजार ६७ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोकण विभाग.
कारवाई कोण करणार?
या संदर्भात कोकण विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई म्हणाले की, प्रतिबंधित पानमसाले, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुगंधित सुपारी आदींच्या
विक्र ीवर राज्य शासनाने लॉकडाऊनच्या आधीपासूनच बंदी घातली आहे. त्यामुळे अशा विक्री करणाºयांवर गेल्या वर्षभरात अनेकदा कारवाई करून कोट्यवधींचा माल जप्त केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात चढ्या दराने जर सिगारेटची लपूनछपून विक्र ी होत असेल तर त्यावर साथ प्रतिबंधक कायद्याखाली पोलीस, दुकाने निरीक्षक किंवा पालिका अधिकारी यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. चढ्या दराने तंबाखू आणि सिगारेट विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाचा अंकुश नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या वर्षभरात ठाणे शहर, ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सिगारेट विक्र ी आणि सेवन करणाºयांविरु द्ध कारवाई केली गेली. मग कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्र ीला बंदी असतानाही छुप्या मार्गाने होणाºया विक्र ीकडे कानाडोळा का केला जातोय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.