Coronavirus : जीवनावश्यक वस्तू वितरणातील पारदर्शकता पूर्ववत करा, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:05 PM2020-04-20T14:05:27+5:302020-04-20T14:07:15+5:30

Coronavirus : लोकांच्या प्रचंड तक्रारी येत असून त्याकडे तात्काळ लक्ष द्यावे तसेच जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वितरणातील पारदर्शकता पूर्ववत करावी अशी मागणी आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली आहे. 

Coronavirus transparency in distribution of essential commodities demand Ravindra Chavan to CM SSS | Coronavirus : जीवनावश्यक वस्तू वितरणातील पारदर्शकता पूर्ववत करा, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Coronavirus : जीवनावश्यक वस्तू वितरणातील पारदर्शकता पूर्ववत करा, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next

डोंबिवली - आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत रास्त भाव दुकानात जीवनावश्यक वस्तूंची व धान्याची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे होरपळली जात आहेत. याबाबत लोकांच्या प्रचंड तक्रारी येत असून त्याकडे तात्काळ लक्ष द्यावे तसेच जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वितरणातील पारदर्शकता पूर्ववत करावी अशी मागणी आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली आहे. 

सन २०१६ ते २०१९ काळामध्ये अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री या नात्याने या विभागात पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेल्या व्यवस्थांचे व उपक्रमांचे पालन आज होत नाही याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यावेळी यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित केली होती याबाबत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे माहिती दिली.

वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी गोडाऊनमधून निघालेल्या ट्रकला जीपीएसने ट्रॅक करणे, ट्रक निघाल्यावर परिसरातील २५ लोकांना मोबाईल मेसेज जाईल ही यंत्रणा कार्यान्वित करणे, रेशन दुकानात अन्नधान्य, वस्तू मिळत नसल्याबद्दल तक्रार नोंदणी करता यावी म्हणून १८००२२४९५० हा क्रमांक पुन्हा कार्यान्वित करणे, रेशन दुकानातील खरेदी विभागाच्या वेब पोर्टलवर उपलब्ध करून त्यात पारदर्शकता आणणे, रेशन कार्डाची पोर्टेबिलिटी यंत्रणा कार्यान्वित केलेली यंत्रणा सक्षमपणे राबवणे अशा विविध उपाययोजना पूर्ववत करण्याचे चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात  नमूद केले आहे.

सदर उपाययोजना पुन्हा अंमलात आणल्यास आजच्या आरोग्य आणीबाणीच्या काळात त्याचा नागरिकांना उपयोग होईल याची खात्री चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच या उपाययोजना केल्याने भ्रष्टाचाराला तर आळा बसलाच होता पण अन्न सुरक्षा योजनेत देशात १ कोटी नागरिकांना समाविष्ट करण्यात आले होते अशी पुस्ती त्यांनी जोडली. म्हणूनच  लवकरात लवकर या योजना पूर्ववत करून वितरणात पारदर्शकता आणावी व गरीब मध्यमवर्गीय नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईतून मुक्त करावे असे आग्रहाने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रात 283 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर

Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या

धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक

Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...

 

Web Title: Coronavirus transparency in distribution of essential commodities demand Ravindra Chavan to CM SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.