CoronaVirus News: टीकेची झोड उठताच परिवहन सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:45 PM2020-06-14T23:45:04+5:302020-06-14T23:45:16+5:30

कर्मचाऱ्यांना दिलासा : भाजपप्रणीत संघटनेने पुकारला होता बंद

CoronaVirus Transport service resumes as soon as criticism arises | CoronaVirus News: टीकेची झोड उठताच परिवहन सेवा सुरू

CoronaVirus News: टीकेची झोड उठताच परिवहन सेवा सुरू

Next

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठीची परिवहन सेवा पालिकेने तडकाफडकी बंद करून कर्मचाºयांचे हाल करणाºया भाजप प्रणित कामगार संघटना, कंत्राटदार व संपकºयांवर गुन्हा दाखल करून कंत्राट रद्द करण्याची मागणी केली गेली. पालिकेने कारवाईचा इशारा दिला होता. याबंदमुळे कंत्राटदार, संघटनेवर टीकेची झोड उठताच  रविवारी सकाळी बंद मागे घेत बससेवा सुरु केली.

मीरा- भार्इंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा कंत्राटदार भागीरथी एमबीएमटी यास पालिकेने पैसे दिले नाही म्हणून कर्मचाºयांचा पगार झाला नाही असा दावा करत भाजप प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने शुक्रवारपासून तडकाफडकी बंद केला. यामुळे ८०० कर्मचाºयांचे कामावरून घरी जाण्यासाठी बसअभावी हाल झाले. शनिवारीही बस नसल्याने अनेक कर्मचारी येऊ शकले नाहीत. पालिकेने शुक्रवारी लेखी पत्राद्वारे कंत्राटदारास मे अखेरीस ९४ लाख दिल्याचे सांगत  कारवाईचा इशारा दिला. कर्मचाºयांना वेठीस धरल्याने संघटनेवर टीका झाली.

कंत्राटदाराची पगार देण्याची जबाबदारी असताना त्याला सोडून पालिकेवर खापर फोडण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप झाले. या प्रकरणी कंत्राट रद्द करून कंत्राटदार, कामगार संघटना व संपकरी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार गीता जैन, काँग्रेस कार्याध्यक्ष प्रमोद सामंत, शिवसेनेच्या कामगार सेनेचे श्याम म्हाप्रळकर, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत आदींनी केली होती.

आपत्तीकाळात बेकायदा संपप्रकरणी आयुक्त चंद्रकांत डांगे कारवाई करणार की नाही ? याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. अखेर, रविवारी सकाळी कमर्चाºयांनी कामावर हजर होत कर्मचाºयांना आणण्यासाठी ठाणे, पालघर व मुंबईसाठी २८ बस सोडल्या. काही चालक आले नाहीत म्हणून तीन बस सुटू शकल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus Transport service resumes as soon as criticism arises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.