Coronavirus : ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, एकनाथ शिंदेंचा ठामपाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 09:15 PM2020-06-05T21:15:44+5:302020-06-05T21:17:17+5:30

Coronavirus : केरळस्थित डॅाक्टरांची ठाणे शहरासाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी शिंदे शुक्रवारी महापालिकेमध्ये आले होते.

Coronavirus : Try to increase oxygen and ventilator beds, Eknath Shinde's order to TMC | Coronavirus : ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, एकनाथ शिंदेंचा ठामपाला आदेश

Coronavirus : ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, एकनाथ शिंदेंचा ठामपाला आदेश

Next

ठाणे : सद्यस्थितीत ठाणे शहरामध्ये जास्तीत जास्त ॲाक्सीजन आणि व्हेंटfलेटर खाटा वाढविण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने प्रयत्न करा असे सांगतानाच कोरोनाविरुद्ध सर्वांनी टीम म्हणून काम करण्याची गरज असल्याचे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. केरळस्थित डॅाक्टरांची ठाणे शहरासाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी शिंदे शुक्रवारी महापालिकेमध्ये आले होते.

यावेळी महापालिका आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिंदे यांनी केरळ सरकारच्या आरोग्य विभागामध्ये उपसंचालक असलेले डॉ. संतोष यांच्याशी केरळस्थित डॅाक्टरांच्या सेवेचा ठाणे शहराला कसा लाभ होऊ शकेल, याविषयी चर्चा केली. 

त्याचप्रमाणे ज्या कोरोनाबाधित रुग्णांना ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, त्यांना ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळायला हवी त्यादृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न करू या, असे स्पष्ट करून शहरात जास्तीत जास्त ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड्स त्वरित निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, असे  शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. त्याचबरोबर कार्डियाक ॲम्ब्युलन्स वाढविण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीनेही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Web Title: Coronavirus : Try to increase oxygen and ventilator beds, Eknath Shinde's order to TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.