coronavirus: दिल्ली अडकलेल्या राज्यातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:38 PM2020-05-18T12:38:45+5:302020-05-18T12:40:38+5:30

सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत.

coronavirus: UPSC students arrive in kalyan by special train | coronavirus: दिल्ली अडकलेल्या राज्यातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने आगमन

coronavirus: दिल्ली अडकलेल्या राज्यातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने आगमन

googlenewsNext

ठाणे - महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी  दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन कल्याण  रेल्वे स्टेशन येथे काल रात्री  १०.४०  वाजता पोहोचली.  कोकण विभागातील सर्व  जिल्ह्यातील ८८विद्यार्थी होते. यामध्ये   मुंबई १८ , ठाणे ४२ , मुंबई उपनगर ९ , पालघर ५ , रायगड ९ रत्नागिरी ५  असे एकुण ८८ विद्यार्थी होते.  या सर्वांना  प्रथम सोशल डिस्टंसींग बाबत सुचना देण्यात आल्या. 

सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा  शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले. ठाणे  शहर आसपासच्या विद्यार्थ्यांना  त्याच्या इच्छीत ठिकाणी जाण्यासाठी आवश्यकते नुसार खाजगी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले. 
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दिपक आकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले.

Web Title: coronavirus: UPSC students arrive in kalyan by special train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.