Coronavirus: लॉकडाऊनमध्येही 'तो' सांभाळायचा मद्यपींची मने; दुकानात आढळला विदेशी दारुचा साठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:55 PM2020-04-13T15:55:38+5:302020-04-13T16:21:01+5:30

मनाई आदेशाचा भंग करून मद्य विक्री करणाऱ्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

Coronavirus: Vasai Police arrested man who sell Foreign liquor in Lockdown | Coronavirus: लॉकडाऊनमध्येही 'तो' सांभाळायचा मद्यपींची मने; दुकानात आढळला विदेशी दारुचा साठा 

Coronavirus: लॉकडाऊनमध्येही 'तो' सांभाळायचा मद्यपींची मने; दुकानात आढळला विदेशी दारुचा साठा 

Next

वसई - लॉकडाऊन मध्ये विदेशी कंपन्यांच्या वेगवेगळ्या बिअर्सची चोरून विक्री करून मद्यपींची मने सांभाळणाऱ्या वसई कोळीवाडया मधील एका 23 वर्षीय तरुणांवर वसई पोलिसांत विविध कलमानव्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर सोमवार दि.12 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाई दरम्यान वसई पोलिसांनी त्या तरुणाच्या दुकानांतील एक्केचाळीस हजार रूपयांचा मद्याचा साठा देखील अन्य मुद्देमाल सहित जप्त केला असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत"ला दिली. जफर अली शिराज शेख वय 23  वर्षे असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो वसई गावातील रहिवासी आहे.

वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने देशात मद्यविक्री पूर्ण बंद आहे.सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व पातळीवर केंद्र व राज्य सरकार व त्यांचे पोलीस प्रशासन नागरिकांना कळकळीचे आवाहन करीत "घरी बसा कोरोनाला टाळा " अशा नानाविध उपाय योजनेत व्यस्त असताना विदेशी कं.च्या बिअर्सची चोरून विक्री सुरु असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षकांना मिळाली असता, पोलिसांनी साईदत्तनगर,कोळीवाडा,फलक आर्ट शॉप ,वसई येथे आरोपी जफर शेख (23) आपल्या ताब्यातील प्रोव्हीबीशन माल बाळगून तो विक्री करीत असताना तसेच संगणकावर ऑनलाईन प्रोव्हीबीशन मालाचा हिशोब करीत असताना तो मिळून आला.

त्याच्याजवळ अनुक्रमे

1) रु.9360 /- बडवायझर बिअर्सचे एकूण 4 बॉक्स

२) रु.6300 /- ट्युबर्क क्लासिक बिअर्सचे एकूण 3 बॉक्स

3) रु.3800 /-ट्युबर्क ग्रीन बिअर्स चे एकूण 2 बॉक्स मध्ये 24 बाटल्या

4)रु.4680 /- हॅनिकेन लार्जर बिअर्स चे एकूण 2  बॉक्स

5)रु.2100 /-हॅनिकेन लार्जर चा 1   बॉक्स त्यामध्ये एकूण 12 बाटल्या

6) रु.15,000 /-डेल कं.चा मॉनिटर व सीपीयू,किबोर्ड असा एकूण मिळून रु.41240 /- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.            

या प्रकरणी वसई पोलिसांनी आरोपी विरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.क्रं.176/2020 प्रमाणे भा.दंड.वि.कलम188,269 आप्पती व्यवस्थापन अधि.51 (ब) ,महाराष्ट्र दारूबंदी अधि.65 (फ )तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधि.1897 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाई मध्ये वसई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शखाली वसई पोलीस ठाण्याचे अधिकारी -कर्मचारी सहभागी झाले होते. 

Web Title: Coronavirus: Vasai Police arrested man who sell Foreign liquor in Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.