coronavirus: लघुउद्योजकांचा याचिका दाखल करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:55 AM2020-05-14T02:55:55+5:302020-05-14T02:56:54+5:30
लॉकडाउन काळात उलाढाल शून्य, खर्च मात्र दुप्पट होत असल्याने लघुउद्योगांस संकटाला सामोरे जावे लागत आहे. लघुउद्योगांच्या अखिल भारतीय स्तरावरील चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : लॉकडाउनमुळे लघुउद्योगांचे कंबरडे मोडले आहे. कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगाराची रक्कम कशीतरी दिली. परंतु, लघुतम, लघु, मध्यम उद्योग आणि व्यावसायिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. आता पगारही देणे शक्य नाही. त्यामुळे या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाउन काळात उलाढाल शून्य, खर्च मात्र दुप्पट होत असल्याने लघुउद्योगांस संकटाला सामोरे जावे लागत आहे. लघुउद्योगांच्या अखिल भारतीय स्तरावरील चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. घटनेच्या कलम २१मध्ये व्यापाराचा अधिकार आहे. ते कर्मचाऱ्यांना लागू असेल तर उद्योजकाला रोजीरोटीचा हक्कही तितकाच आवश्यक आहे.