coronavirus: उल्हासनगर रेल्वे स्थानकाला हवा लोकल थांबा, हजारो नागरिकांत असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:58 PM2020-06-17T16:58:55+5:302020-06-17T16:59:27+5:30
उल्हासनगर महापालिका क्षेत्र असून शहर व्यापारी केंद्र आहे. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शहरातून हजारो नागरिक मुंबईसह इतर ठिकाणी दररोज ये जा करतात.
उल्हासनगर : महापालिका क्षैत्र असलेल्या उल्हासनगरची लोकसंख्या ९ लाखा पेक्षा जास्त असून हजारो नागरिक शासकीय व अत्यावश्क सेवा देण्यासाठी मुंबईसह इतर ठिकाणी दररोज ये जा करतात. मात्र रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनला थांबा न दिल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटत असून थांबा देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी रेल्वे विभागाला केली आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्र असून शहर व्यापारी केंद्र आहे. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शहरातून हजारो नागरिक मुंबईसह इतर ठिकाणी दररोज ये जा करतात. रेल्वे विभागाने उल्हासनगर स्टेशनला थांबा न देवून सावत्रपणाची वागणूक दिली. अशी टीका सर्वच पक्षासह सामाजिक संघटनेने केली असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच स्थानकाला थांबा देण्यासाठी रेल्वे विभागाला लेखी निवेदन दिले असून शहरातील हजारो नागरिक अंबरनाथ अथवा कल्याण रेल्वे स्थानकाला जाणार असल्याने सोशल डिस्टन्स राहणार का? असा प्रश्न त्यांनी निवेदनात करून रेल्वे विभागाच्या आदेशावर टीका केली.
उल्हासनगरच रेल्वे स्थानकाला थांब्या दिल्यास उपासमारीची वेळ आलेल्या रिक्षा चालकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ व पैसे वाचणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने व महाराष्ट्र सरकारने उल्हासनगर रेल्वे स्टेशनला लोकलचा थांबा करावा. अशी विनंती पक्षाच्या निवेदनात केली आहे.