Coronavirus: महापालिका आरोग्य विभागाचे कौतुक; उल्हासनगरात ६० ऑक्सिजन तर इतर १५० पेक्षा जास्त बेड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 06:13 PM2021-04-26T18:13:37+5:302021-04-26T18:15:41+5:30

उल्हासनगर महापालिकेने कोविड रुग्णासाठी विविध आरोग्य सुविधेसह आरोग्य केंद्र सुरू केले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णाची संख्या घटून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे समाधानकारक चित्र शहरात आहे.

Coronavirus:Ulhasnagar has 60 oxygen and more than 150 other beds | Coronavirus: महापालिका आरोग्य विभागाचे कौतुक; उल्हासनगरात ६० ऑक्सिजन तर इतर १५० पेक्षा जास्त बेड उपलब्ध

Coronavirus: महापालिका आरोग्य विभागाचे कौतुक; उल्हासनगरात ६० ऑक्सिजन तर इतर १५० पेक्षा जास्त बेड उपलब्ध

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या विविध कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची ६० तर इतर १५० पेक्षा जास्त बेड शिल्लक असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. दरम्यान कॅम्प नं-४ येथील शासकीय कोविड रुग्णालय सुरू केले असून महापालिका शाळा क्रं.१४ मध्ये २०० बेडचें आरोग्य सुविधा केंद्र सुरू केल्याची माहिती देऊन, ऐन कोरोना काळात शहरवासीयांना दिलासा दिला. 

उल्हासनगर महापालिकेने कोविड रुग्णासाठी विविध आरोग्य सुविधेसह आरोग्य केंद्र सुरू केले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णाची संख्या घटून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे समाधानकारक चित्र शहरात आहे. महापालिकेचे साई प्लॅटिनियम कोविड रुग्णालयात, रेडक्रॉस रुग्णालयात व कॅम्प नं-४ येथीलशासकीय कोविड रुग्णालय आदी मध्ये ६० पेक्षा जास्त ऑक्सिजन बेडसह इतर १५० बेड शिल्लक आहेत. तसेच महापालिका शाळा क्रं-१४ मध्ये आरोग्य केंद्र सुरू केले असून तेथे २०० बेडची व्यवस्था केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच डॉक्टरसह नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बार्डबॉयची भरती केल्याची माहिती देऊन रुग्णांना योग्य उपचार मिळणार असल्याची खात्री दिली. 

देशातील अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र असतांना, महापालिका आरोग्य विभागाच्या तंत्रशुद्ध कामगिरीने रुग्णांसाठी बेड शिल्लक आहेत. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाही. अशी ओरड रुग्णाचे नातेवाईक करीत असतांना महापालिका आरोग्य विभागाने त्यांचे म्हणणे खोडून, कोविड व आरोग्य केंद्र रुग्णालयात शिल्लक बेड दाखवून, शहरवासीयांना दिलासा दिला. महापालिका कोविड रुग्णालयासह खाजगी रुग्णालयाला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर महापालिका आरोग्य विभागाचे लक्ष असून शहरात अद्याप ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला नसल्याचे उपायुक्त नाईकवाडे यांनी सांगितले. आयुक्त डॉ राजा दयानिधी आज महापालिका सेवेत रुजू होणार होते. मात्र रुजू न झाल्याने, पुन्हा त्यांच्या बदलीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली. आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, ते सुट्टीवर आहेत. 

महापालिका आरोग्य विभागाचे कौतुक 

महापालिकेचे अतिरिक आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे, उपायुक्त मदन सोंडे यांनी वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे, डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे, यांच्यासह आरोग्य विभागाच्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्या कामाचे कौतुक केले. महापौर लिलाबाई आशान यांनी आरोग्य विभागाच्या कामाचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली.

Web Title: Coronavirus:Ulhasnagar has 60 oxygen and more than 150 other beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.