त्या विक्रेत्याच्या संपर्कातील नागरीकांची शोध मोहीम कठीण, कोपरीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:06 PM2020-04-17T17:06:54+5:302020-04-17T17:08:37+5:30

ठाणे : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कोपरीच्या सीमाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र अखेर गुरुवारी या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण ...

Coroner's first patient search campaign found in contact with the seller | त्या विक्रेत्याच्या संपर्कातील नागरीकांची शोध मोहीम कठीण, कोपरीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

त्या विक्रेत्याच्या संपर्कातील नागरीकांची शोध मोहीम कठीण, कोपरीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

Next

ठाणे : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कोपरीच्या सीमाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र अखेर गुरुवारी या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या एका पोलीसाला याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे सावरकरनगर भागातही एका रुग्म आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण येथील मार्केटमधील एक विक्रेता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याच्या संपर्कात कीती नागरीक आले होते, याचा शोध घेण्यासाठी पालिका प्रशासानची आता तारेवरची कसरत सुरु झाली आहे. मुळात जिल्ह्यातील सर्वच मार्केट १४ एप्रिल पर्यंत बंद करण्याचे आदेश होते. परंतु असे असातांना या भागातील मार्केट हे पहाटे ३ ते ५ वाजेपर्यंत सुरु असल्याची धक्कादायक माहितीही या निमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे हे मार्कट सुरुच कसे होते, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
                 एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन तारेवरची कसरत करत आहे. असे असतांनाही नागरीक काही ऐकण्यास तयार नसल्याचेच दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळातही भाजी खरेदी करण्यासाठी विविध मार्केटमध्ये गर्दी करतांना दिसत आहेत. दरम्यान सावरकर नगर भागात जो रुग्ण आढळला आहे, त्यामुळे आता येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून १४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील सर्व मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु असे असतांना याच कालावधीत रात्री ३ ते ५ या कालावधीत येथील इंदिरा नगर भागात मार्केट भरले जात होते अशी माहिती येथील स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. या मार्केटमध्ये संध्याकाळी जशी गर्दी असते, तशीच गर्दी दिसून येत होती. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाची भिती सतत मनात सतवत असल्याने त्या संदर्भात पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणांकडेही तक्रार करण्यात आल्याचे रहिवाशांचे म्हणने आहे. परंतु त्यांच्याकडून याची दखल घेतली गेली नाही.
             दरम्यान येथील रहिवाशांच्या मनात जी भिती होती, आता की खरी होतांना दिसत आहे. येथील एका विक्रेत्यालाच गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पालिकेची धावपळ सुरु झाली आहे. या मार्केटमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळी दुरवरुन येणाºया नागरीकांची नेहमीच गर्दी असते. त्यात लॉकडाऊनच्या त्यातही जिल्ह्यात इतरत्र भाजी मार्केट बंद असल्याने येथे पहाटे गर्दी होतांना दिसत होती. त्यामुळे आता हा विक्रेता किती नागरीकांच्या संपर्कात आला आहे, हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. परंतु अशा नागरीकांचा तपास करायचा तरी कसा हे देखील सांगणे आता कठीण झाले आहे. परंतु येथील नागरीक आता चांगलेच भयभीत झाले आहेत. परंतु या मार्केटला पाठीशी कोणी घातले, कोणाच्या आर्शिवादाने हे मार्केट सुरु होते. असे अनेक सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत.
              दरम्यान ठाणे पूर्व येथील कोपरी हा भाग ग्रीन झोन घोषीत झाला होता. परंतु त्यानुसार येथील बाहेरुन येणाºया सीमाही बंद करण्यात आल्या होत्या. परंतु एवढे केल्यानंतरही आता या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. एका पोलीसाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर पोलीस कर्मचारी हा मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या पोलीस स्टेशनच्या वरीष्ठाला कोरोनाची लागण झाली असल्याने त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत, त्याच्यांच संपर्कात आल्याने कदाचित या पोलिसाला देखील कोरोनाची लागण झाली असावी असा कयास लावला जात आहे.
 

 

Web Title: Coroner's first patient search campaign found in contact with the seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.